कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांन समवेत सेवाधर्म परिवार व नारीशक्ती सखी मंचची अनोखी रक्षाबंधन उत्साहात साजरी…

जळगाव दिनांक:२२ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधन साजरी करण्यात आली.

जळगाव शहरात रक्षाबंधन निमित्ताने कर्तव्यदक्ष पोलीस बांधव आणि एसटी बस वाहक चालक, अनाथ भिकारी , बांधवान समवेत सेवाधर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंच तर्फे अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली.

ज्यांच्यामुळे आपण सर्व घरोघरी विविध सण आनंदाने उत्साहाने साजरे करतो पण सण असूनही आपल्या कुटुंबापासून दूर राहून 24 तास कर्तव्य करीत असलेल्या एसटी बस वाहक चालक व पोलिस अशा कर्मचारी बंधूंसाठी तसेच रस्त्यावरील अनाथ भिकारी यांच्या मनातील भावना जाणून भावा बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन…

रक्षाबंधन सणाच्या दिवशी सेवा धर्म परिवार आणि नारीशक्ती सखी म्हणजेच या महिला भगिनी यांनी आज सरसावून पुढे येऊन बहिणीचे कर्तव्य समजून जळगाव शहरातील विविध चौकात कर्मचारी बांधवांच्या कार्य करण्याच्या स्थळी जाऊन प्रत्यक्ष राखी बांधून आणि ओवाळून रक्षाबंधन सण साजरा करून या बांधवां विषयी प्रेम व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला असून..

भाऊ बहिणीच्या नात्यातला समाजासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे. जणू काही हे रेशमाचे बंध सांगत आहे… “रेशमाच्या बंधनात दादा बांधीते मी तुला! जन्मोजन्मी असू दे रे तुझा पाठींबा हा मला!!

बहिण आपल्या भावाला धागा बांधून रक्षाबंधन साजरे करत असते व माझे रक्षण कर असे सांगते.परंतु आज खऱ्या अर्थाने वृक्ष संवर्धन व त्याचे रक्षण हे पण फार महत्वाचे बनले आहे कारण वृक्ष हे आपल्याला ऑक्सीजन देऊन जीवन देत असतात.पर्यावरणाचा समतोल योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षांची फार गरज आहे हे लक्षात घेता सेवाधर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंच वृक्षांना सुद्धा राखी बांधून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

अशा सुंदर अनोख्या उपक्रमात सेवा धर्म परिवार आणि नारीशक्ती सखी मंचच्या सौ मनीषा पाटील ,भावना चौव्हाण ,ज्योती राणे ,नेहा जगताप, रंजन पटेल, रेणुका हिंगू, माधुरी जावळे, सुमित्रा पाटील, सुरेखा पाटील, वंदना कोष्टी , अलका बागुल, योगिता बाविस्कर, आरती शिंपी यांनी सहभाग घेतला. सेवा धर्म परिवार अध्यक्ष चंद्रशेखर नेवे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.नात्यातील गोडवा वाढविणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!