मिठाई दुध, दुग्धजन्य व इतर अन्न पदार्थ विक्रेते व ग्राहकांसाठी सुचना भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणार्‍यांवर करणार

जालना,

जालना जिल्ह्यात आगामी दिपावली 2021 चा सण सर्व नागरिकांकडून व जिल्हावासियांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नागरिक आपल्या कुटूंबियांसाठी व आपल्या आप्तेष्टांसाठी मिठाई, पेढे, दुध व दुग्धजन्य पदार्थ, इतर गोड व नमकीन अन्न पदाथार्ंची मोठ्या प्रमाणात मागणी होते त्यानुषंगे जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिक यांना अन्न व औषध प्रशासन म.राज्य जालना यांचेकडून सुचित करण्यात येते की त्यांनी या दिपावली सणात विशेष काळजी घेवून नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न पदाथार्ंचा पुरवठा,विक्री करावी व साठवणूक हि निर्भेळ वातावरणात करावी तसेच त्यांनी आपल्या अन्न पदाथार्ंचे उत्पादन करताना दर्जेदार पदाथार्ंचा वापर करावा ज्यामुळे भेसळमुक्त, ताजे व दर्जेदार अन्न पदाथार्ंचा आस्वाद जिल्ह्यातील नागरिकांना घेता येईल. तसेच मिठाई व स्वीट मार्ट व्यावसायिकांनी विहीत नियमानुसार आपल्या अन्न पदाथार्ंना मुदतबाह्य दिनांक द्यावी व ती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावी.

जिल्ह्यातील नागरिकांनी मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ती ताजी आहे याची खात्री करुन किमान आवश्यकतेनुसार खरेदी करावी व बिलांशिवाय ते खरेदी करु नयेत. तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थ नोंदणीधारक व परवानाधारक दुकानदारांकडूनच खरेदी करावेत. उघड्यावरील मिठाई, खवा (मावा) खरेदी करु नये तसेच ़फेरीवाल्याकडून खवा (मावा) खरेदी करु नये. माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासांच्या आत करावे. त्याची साठवणूक योग्य तापमानास फ्रिजमध्ये करावी. बंगाली व तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो 8 ते 10 तासांच्या आत करावे. मिठाईचे सेवन शक्यतो 8 ते 10 तासांच्या आत करावे. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचे सेवन न करता ती नष्ट करावी. ग्राहकांना अन्न पदार्थाच्या गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन म.राज्य जालना यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन श्री पी. एस. नलवडे सहायक आयुक्त (अन्न) यांचेकडून करण्यात येत आहे.

या सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनात़र्फे धडक मोहिम राबविण्यात येत आहे ज्यात भेसळीचा संशय असलेले खाद्यतेल,मिठाई,खवा,तुप,आटा,रवा,मैदा इत्यादींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत  आहे. याद्वारे जिल्ह्यातील अन्न व्यावासायिकांना निर्वाणीचा सुचक इशारा देण्यात येत असून दर्जाहीन अन्न पदाथार्ंची विक्री उत्पादन व साठवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व अन्न व्यावसायिक यांनी नोंद घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य जालना यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!