बिज भांडवल योजनेसाठी अर्ज उपलब्ध

जालना,

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत असुन सन 2021-22या आर्थिक वर्षासाठी खाली दर्शविण्यात आलेले उद्दिष्ट प्राप्त आहेत.

20 टक्के बिजभांडवल एकुण 66 कर्ज प्रकरणे 40 लाखांसाठी, 34 प्रकरणे 2.50 लाखापयर्ंत व त्यावरील 2.50 लाख ते 5.00 लाखापयर्ंत 32 प्रकरणे असे असतील, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 65 कर्ज प्रकरणे रुपये 74.10 लाखांसाठी, गट कर्ज व्याज परतावा 13 कर्ज प्रकरणे रुपये 74.10 लाखांसाठी , महामंडळाची थेट कर्ज योजना 109 कर्ज प्रकरणे 109 लाखांसाठी आहेत.

 इतर मागास वर्गीय प्रवर्गात मोडणार्‍यसा आणि वय 18 ते 50 वर्ष या दरम्यान असणार्‍या गरजु इच्छुक लाभार्थींनी सन 2021-22 या वषा-साठी ऑनलाईन संकेतस्थळावर प्रकरणे दाखल करावेत. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यालयात मुळ कागदपत्रासह संपर्क करावा.

तसेच 20 टक्के बिज भांडवल योजने करीता राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 66 कर्ज प्रकरणासाठी अर्ज तसेच थेट कर्ज योजना अर्ज विक्री चालु असुन अर्ज संपेपयर्ंत चालु राहतील याकरीता जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, वयाचा पुरावा, टी.सी. इत्यादी कागदपत्राची सत्यप्रत अर्ज खरेदी करताना कार्यालयात दाखल करावी.

योजने करीता महामंडळाचे जिल्हा कार्यलय महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला जालना येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!