अभिवादन सोहळा : कोरोना योध्द्यांचा सत्कार ,रक्तदान, साड्या वाटप, स्वच्छता अभियान

जालना,

प्रखर राष्ट्रनिष्ठा ,माती व आपल्या माणसांवरील अन्याया विरुद्ध बंड करण्याची वृत्ती, सर्व सामान्यांना आधार असे आदर्शवत असलेले स्वा. सै.रामभाऊ जी राऊत यांचा सहवास, मार्गदर्शन लाभले हे आपले भाग्य असून त्यांचे स्वातंर्त्यलढ्यातील योगदान व सामाजिक कार्य दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी असल्याची भावना शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज अभिवादन सोहळ्यात व्यक्त केली.

स्वा. सै. रामभाऊ जी राऊत यांच्या 35 व्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी ( ता. 25) राजेश राऊत व राऊत परिवारातर्फे कोरोना योध्द्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, महिला सफाई कामगारांना साड्या वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. बसस्थानका जवळील पुतळ्यासमोर आयोजित अभिवादन सोहळ्यात श्री. खोतकर बोलत होते. या वेळी भास्करराव आंबेकर, नगराध्यक्षा सौ. संगीता ताई गोरंट्याल, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे,मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अंकुश राव देशमुख, विनीत साहनी, बबलू चौधरी, मधुकर हाटवटे, अक्षय गोरंट्याल, प्रतिक दानवे, शुभांगी देशपांडे, अंकुशराव राऊत, गणेशराव राऊत, राजेश राऊत,नंदकिशोर जांगडे, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे ,राजेंद्र भोसले, राजेंद्र गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, स्व रामभाऊ जी राऊत यांच्या सामाजिक कार्याचा वारसा राऊत परिवाराने जोपासला असून राजेश राऊत हे समाज उपयोगी उपक्रमांतून कुटुंबाच्या नावलौकिकात भर घालत असल्याचे गौरवोद्गारही श्री. खोतकर यांनी काढले.

भास्करराव आंबेकर म्हणाले, स्व .रामभाऊ राऊत, बलीराम यादव, मनोहरराव जळगावकर यांनी सामान्यांच्या सुख-दु:खात समरस होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची मानसिकता ठेवली .आज वाढदिवस, होडिर्ंग्ज, समाज माध्यमे अशा आभासी जगात हरवलेल्या तरुणांनी राजकारणात येताना स्व. आप्पांचा आदर्श घेऊन गरजवंतांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आंबेकर यांनी केले.

नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंट्याल यांनी राऊत परिवाराने सामाजिक कार्याचा वसा जतन केला असून पुतळा उभारणीसाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आ. कैलास गोरंट्याल यांनी पाठपुरावा केल्याची आठवण सांगीतली.

अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख म्हणाले, रंजल्या-गांजल्यांना मदत करण्याची प्रेरणा घेऊन हा वसा पुढील पिढीने अधिक वृद्धिंगत करावा, असा आदर्श प्रत्येक कुटुंबाने घ्यावा. अशी अपेक्षा विक्रांत देशमुख यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात राजेश राऊत यांनी कोरोना काळात रक्ताची नाती दुरावली असताना, जीवावर उदार होऊन अंत्यसंस्कार करणारे कोरोना योद्धे तसेच रोगराई पासून शहरवासियांना वाचविण्यासाठी अविरत पणे स्वच्छता वाहक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून त्यांचा गौरव व्हावा याच हेतूने पुण्यतिथीनिमित्त गौरव सोहळा व सामाजिक उपक्रम आयोजित केल्याची भूमिका राजेश राऊत यांनी स्पष्ट केली.

दीपक कोल्हे, अंकुश राव देशमुख, बबलू चौधरी, शुभांगी देशपांडे ,नंदकिशोर जांगडे, अक्षय गोरंट्याल यांची समयोचित भाषणे झाली. कोरोना योध्द्यांचा सत्कार तसेच स्वच्छता विभागातील महिला कामगारांना साडी-चोळी व मिठाई चे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले तर अर्जुन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्ञानदेव पायगव्हाणे, सिद्धिविनायक मुळे, नगरसेवक विष्णू वाघमारे, विशाल बनकर, महेश निक्कम, तान्हाजी राऊत, वामनराव राऊत, विजयकुमार पंडित, श्याम लोया, हेमंत ठक्कर, संदीप पाटील, अशोक पडूळ,प्रकाश जगताप, अनिल संचेती, शुभम टेकाळे, दिगंबर गायकवाड, रोशन चौधरी, रवींद्र राऊत,विनोद पवार, सुरेश राऊत ,आशिष राऊत ,अमोल राऊत, सुधीर राऊत, सतीश जाधव ,सुरेश गाजरे, प्रमोद सोळुंके, अर्जुन गेही ,अंकुश पाचफुले,धनराज काबलीये, प्रकाश जगताप ,विजय राऊत, रूपेश राऊत, सागर देवकर, ओम राऊत, रोहित चव्हाण,सतीश बाभळे, किशोर बोबडे, अक्षय राऊत ,सुरेश गुलगे, गणेश भोसले, विनोद पटेल ,रुपेश जैस्वाल, राजू बिकानेर, मनोहर गुळवे, अ‍ॅड.रवींद्र डुर्रे, खंडेश जाधव यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!