कट्टा सखी सुगरण ग्रुप आणि नगर सेविका मा. सौ. सुरेखा ताई तायडे यांचे तर्फे संयुक्त विद्यमाने गणपती विशेष कार्यक्रम घेण्यात आले….

जळगाव प्रतिनिधी –

कट्टा सखी सुगरण ग्रुप आणि प्रभाग क्रमांक 13 च्या नगर सेविका मा. सौ सुरेखा ताई तायडे यांचे तर्फे संयुक्त विद्यमाने. गणपती विशेष कार्यक्रम घेण्यात आले..
त्यामध्ये मोदक स्पर्धा, थाली सजावट स्पर्धा तसेच हार बनवणे स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.
तसेच महिलांसाठी हळदी कुंकू चे आयोजन देखील करण्यात आले होते.
कार्यक्रमात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी काही खास मान्यवरांची उपस्थिती लाभली होती जसे की जामनेर च्या नगर अध्यक्षा मा.सौ साधना ताई महाजन तसेच जळगाव नगर पालिकेच्या आयुक्त मा .सौ विद्याताई गायकवाड मँडम मा.सौ नगर सेवीका गायत्री ताई राणे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. एकूण 300 ते 350 महीलांची उपस्थिती होती त्यापैकी 80 स्रियांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून बक्षिस पटकविलीत .
कट्टा सखी सुगरण ग्रुप च्या अध्यक्षा सौ शैला चौधरी तसेच सौ सरला वाणी, सौ दिपाली कुलकर्णी,सौ शुभांगी चौधरी, श्रीमती माधुरी जावळे सौ जयश्री ढगे,सौ मनिषा ठाकुर सौ वैशाली गुरव , पुजा सोनवणे ,सौ पल्लवी देसाई यांने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परीश्रम घेतले..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!