जिल्ह्यात व्ही स्कूल (वोपा) सोबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा अधिकाऱ्यांकडून विनोद सावळे सर यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान..

माध्यमिक विद्यालय भोलाणे येथील शिक्षक विनोद सावळे यांचा जिल्हा सभागृह जळगाव येथे सन्मान करण्यात आला.

जळगाव प्रतिनिधी-
व्ही स्कूल (वोपा ) या टीम ने कोविड-19 च्या परिस्थितीला अनुसरून तळागाळातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण घेता यावे यासाठी व्ही स्कूल या ॲपची निर्मिती केली.

तर या व्ही स्कूल ॲपद्वारे डिजिटल अभ्यास निर्मिती साठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अनुमतीने जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये व प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा लाभ घेता यावा या उद्देशाने वोपा टीम, व्हाव्हेल्स ऑप द पीपल असोसिएशनचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत, पुणे यांच्या संयोगाने डिजिटल कन्टेन्ट डेव्हलप करण्यासाठी टेक्नोसॅव्ही, होतकरू, ज्ञानपिपासू व शैक्षणिक कामाची आवड असणारे असे जिल्हाभरातील शिक्षक व शिक्षिका यांचे सहकार्य च्या माध्यमातून वोपा टीमने अभ्यासाचे कंटेंट डेव्हलप केले म्हणून जिल्हाभरातील शिक्षक यासोबत जोडले गेले त्यात माध्यमिक विद्यालय भोलाणे चे शिक्षक विनोद सावळे यांनी देखील उल्लेखनीय सहभाग नोंदवत कन्टेन्ट डेव्हलप करणे कामी आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावून व्ही स्कूल या प्रकल्पांमध्ये विशेष सहकार्य करून सहभाग नोंदवला .





अशा शिक्षक शिक्षकांचा सन्मान जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सी.ओ.साहेब पंकज अशियाना, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील,करीम सालार या सर्व मान्यवरांच्या उपस्थित शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान जळगाव जिल्हा सभागृह येथे करण्यात आला.

विनोद सावळे सरांचे या कार्याबद्दल त्यांचे मित्र परिवार सेवाभावी संस्था यांनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!