चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी जळगावच्या सेवा धर्म परिवाराचा मदतीचा हात….महापौर सौ.जयश्री महाजनांनी दाखविला हिरवा झेंडा.

जळगाव: चाळीसगावसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक गावांतील लोकांचे संसार वाहून गेल्याने ते अक्षरशः रस्त्यावर आले. डोक्यावर छप्पर राहीले नाही. त्यामुळे अशा गरजू लोकांसाठी मदतरूप होण्यासह सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी जळगावातील सेवा धर्म परिवारासह लायन्स क्लब, नारी शक्ती ग्रुप, कला सिद्धी फाऊंडेशन, झाशीची राणी बचत गट आदी संस्था, संघटनां सह सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई खोडपे,रमेशकुमार मूनोत,भारती रंधे,भारती कुमावत सुमित्रा पाटील यांनी दिलेल्या मदतीच्या आधारे ,मोठ्या प्रमाणात कपडे, धान्य, किराणा आणि औषधांचे किट संबंधित आपत्तीग्रस्त कुटुंबांना वाटपासाठी मंगळवार, दि.7 सप्टेंबर 2021 रोजी वाटप करण्यात आले,

सकाळी आठच्या सुमारास आदर्शनगर परिसरातील लायन्स हॉलमधून ट्रकद्वारे रवाना करण्यात आले. या ट्रकला जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी हिरवा झेंडा दाखविला.
ह्या ट्रकद्वारे चाळीसगाव, रोकडे, बोरराडे खुर्द, पातोंडा या गावांमध्ये नुकसानग्रस्त गरीब वस्तीत जाऊन प्रत्यक्ष गरजू लोकांना ही सर्व मदत प्रांताधिकारी श्री लक्ष्मीकांत सातळकर तहसीलदार श्री अनिल मोरे यांच्या उपस्थितीत संस्थांमार्फत वाटप करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील सेवा धर्म परिवार हा विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाचा समूह आहे
कोणतीही आपत्ती असली किंवा कोणत्या गरजूंना मदत आवश्यक असेल तर परिवारातील सर्वच सदस्य या कामी उस्फुर्तपणे मदत कार्यात सहकार्य करीत असतात. अशीच अनमोल मदत आणि सहकार्य या सर्वांनी केले.

याप्रसंगी सेवाधर्म परिवाराचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर नेवे, नारी शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मनीषा पाटील, कला सिद्धी फाऊंडेशनच्या सौ.आरती शिंपी, सौ.सुमित्रा पाटील, सौ.रेणुका हिंगू, सौ.आरती व्यास, सौ.सुश्मिता भालेराव, सौ.बेबीताई खोडपे, सौ.भारती कुमावत, सौ.भारती म्हस्के रंधे, श्री.रमेशकुमार मुणोत, श्री.राजेश खोडपे, श्री.अमेय शिंपी, श्री.सागर चव्हाणे, श्री.रवींद्र चव्हाण, श्री. अजय भालेराव, श्री.संजय साळुंखे, सौ.कोमल साळुंखे, रुद्राणी देवरे सौ.सुनीता पाटील, योगिता बाविस्कर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.किरण गांधी, सचिव श्री.रोहित अग्रवाल, रामनारायण वर्मा, रिजन चेअरमन रवींद्र गांधी, झोन चेअरमन श्री.जयेश ललवाणी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!