शिवसेना आमदाराचे नारायण राणेंबाबत प्रक्षोभक वक्तव्य; भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया (सुधारित)

हिंगोली,

महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यावरून अगोदरच महाराष्ट्रातील राजकारणत तापलेले असताना व काल भाजप आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष पाहायला मिळालेला आहे. त्यातच आता आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे.

आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबाबत शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तर, भाजपने याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले असून, तक्रार देखील दाखल केली जाणार असल्यामुळे राजकारणातील खळबळजनक वक्तव्यांची मालिका ही थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले की, अरे तू काय सांगतो, कुठे यायचे. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझे पोलीस संरक्षण थोडेसे बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केले आणि तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.

आज आमदार संतोष बांगर यांचे हे वादग-स्त वक्तव्य समोर आल्यापासून भाजप नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवाय आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात भाजप तक्रार देखील दाखल करणार आहे. ही माहिती हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!