विकी-कतरिनाची लगीनघाई? ’हा’ सेलिबि-टी डिझायनर शिवणार लग्नपोशाख

मुंबई,

बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. कधी कलाकारांच्या अफेअरच्या तर कधी ब-ेक-अपच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चे सोशल मीडियावर सुरू होती. ऑॅगस्ट महिन्यामध्ये विकी आणि कतरिना यांचा साखरपुडा झाला आहे, अशा पोस्ट काही नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता हे दोघ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विकी आणि कतरिना डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. पण त्यांचा हा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिबि-टी डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत.

18 ऑॅगस्ट रोजी विकी आणि कतरिनाच्या साखपुडा झाला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता त्याच्या लग्नाबद्दल देखील सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करत आहेत. पण अजूनही लग्नाबाबत आणि साखरपुड्याबाबत विकीने आणि कतरिनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिनाच्या नात्याबद्दल त्याचे मतं मांडले होते. त्याने सांगितले होते, ’विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत आहेत. आता हे सांगितल्यावर मला कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल ते माहित नाही. ’

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या सरदार उधम हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 16 ऑॅक्टोबर रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!