श्वेता तिवारी करतेय तिसर्‍या लग्नाची तयारी? या अभिनेत्यासोबत सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई,

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. पण आता श्वेता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर पुन्हा श्वेताला ट्रोल करण्यात आलं आहे. श्वेताने मित्र विकास कलांत्री सोबत पोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे श्वेता वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं श्वेताला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी श्वेता तर्‍हे-तर्‍हेचे प्रश्न विचारले आहेत.

सोशल मीडियावर विकास कलांत्रीसोबत फोटो पोस्ट करत शेअर करत भावूक असं कॅप्शन लिहिलं आहे. ’तु माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे असं म्हणत तिने कॅप्शनमध्ये शेवटी मी तुझ्यावर प्रेम करते अंस लिहिलं आहे. यावर विकासने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या श्वेता ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

श्वेताच्या पोस्टवर विकास म्हणाला, ’तुझ्या प्रेमाबद्दल आभार. माझ्या आयुष्यात तुझं फार महत्त्वाचं स्थान आहे.’ विकासच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर तर्‍हे-तर्‍हेचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी विकासला श्वेताचा तिसरा पती असं म्हटलं आहे. तर एकाने लिहिलं की, ’आता या व्यक्तीचं आयुष्य देखील खराब करशील… त्यानंतर घटस्फोट घेशील….’

श्वेताबद्दल सांगायचं झालं तर ती ’कसौटी जिंदगी की’ मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आली. मालिकेत तिने मुख्य भूमिका बजावली होती. श्वेता अनेकता तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!