प्रहार जनशक्ती चा एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा

भुसावळ (प्रतिनिधी)

भुसावळ आज एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत उपोषणाला भुसावळ प्रहार जनशक्ती पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कामगारानिं संयुक्त कृती समितीअंतर्गत विविध मागण्या लावून धरल्या आहेत
१) महागाई भत्ता२८% देण्यात यावा
२) वार्षिक वेतन वाढ २% ऐवजी 3% करण्यात यावे
३) घर भाडे भत्ता ७१,४२१ ऐवजी ८१,६२४ मिळाला पाहिजे
४) दरमहा नियमित वेतन ठरल्यावेळी मिळाले पाहिजे
५) सन उचल किंमत शासकीय कर्मचारी सारखे १२५०० द्यावे
६) महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वार्षिक वेतन ची थकबाकी रक्कम एकरकमी दिवाळी आधी देण्यात यावी
या मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती तर्फे बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाचे तर्फे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या पत्राद्वारे पूर्ण समर्थन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!