बिजेपी महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अन् धमकी

बीड,

बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र याची ऑॅडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल (झाली आहे. अक्षय मुंदडा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की दोन महिन्यांपूर्वी ॠषिकेश अण्णासाहेब लोमटे यांचा फोन आला. त्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी ॠषिकेश अण्णासाहेब लोमटे रा. अंबाजोगाई यांचा फोन आला. त्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले. तर याप्रकरणी अक्षय मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अक्षय मुंदडा हे माजी मंत्री स्व. विमलताई मुंदडा यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते भाजपच्या केज मतदार संघातील विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे पती आहेत. देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सुरुवातीला ॠषिकेश लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. तुमच्या हाताने उद्घाटन करू काम करू द्या असं लोमटे हे सांगत असल्याचं व्हायरल ऑॅडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

विनंती करूनही आमदार पतीने ऐकल्यामुळे ॠषिकेश लोमटे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच इकडे आला तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आमदार पती यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या ऑॅडिओ क्लिप वरून विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम कोण करतय याची चर्चा सुरू आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतीच्या शेती उद्धवस्त झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केल्यावर आमदार नमिता मुंदडा यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच शेतकर्‍यांना पहेक्टरी 50 हजारांची सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!