खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सक्षम : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव

दि. 12  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध बियाण्याचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असून, खरीप हंगामात कृषी विभागाने सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांचे बियाणे प्रात्यक्षिक वाटपाचे नियोजन केले आहे. कोरोनाची मरगळ झटकत शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या मशागतीला वेग दिला आहे. यंदाचा खरीप हंगाम चांगला येईल अशी आशा असली तरी आर्थिक दुर्बल घटकासह मागासवर्गीय, विधवा, कोरोनाग्रस्तामुळे बाधित झालेल्या कुटुंबासह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मोफत बियाणे वाटप करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी बियाणे वितरण करणाऱ्या कंपन्यांनी सि.एस.आर.निधीतून सामाजिक बांधिलकी जपत बियाणे उपलब्ध करून दिल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

कृषिमंत्री  दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टेहरे, पाटणे, चिंचावड, आधार खु., नांदगांव, वाके, सौंदाणे, दाभाडी, पिंपळगाव, जळगाव गा., बेळगांव, रावळगांव, सातमाने, दुंधे, तळवाडे, पांढरूण, ढवळेश्वर, आघार बु. या गावातील आर्थिक दुर्बल घटकासह गरजू शेतकऱ्यांना आज बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, संजय दुसाणे, रामभाऊ मिस्तरी, चेतन पवार, सुरेश पवार, शशी निकम, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, अनिल निकम, अविनाश निकम, दिपक मालपुरे, युपीएल कंपनीचे पंकज पाटील, केदारे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, यंदाच्या मृग नक्षत्रात पावसाचे चांगले संकेत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनासाठी उत्साहाचे वातावरण आहे. पेरण्या वेळेवर होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे बी-बियाणे आणि शेतीचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नियेाजन केले जात आहे. खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, राज्यात बियाण्यासह रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही. यंदा युरिया सारख्या खताचा 75 हजार मेट्रीक टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. जैविक बिजप्रक्रिया करून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. पायोनियर, कृषिधन, बुष्टर सिड्स, टाटा रॅलीज, ॲडव्हंटा आणि राशी सिड्स या कंपन्यांमार्फत त्यांनी सामाजिक बाधिलकी जपत शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिल्यामुळे त्यांचेही आभार त्यांनी यावेळी मानले.

यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. त्याच बरोबर कृषी विभगाामार्फत चालू खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांसाठी बाजरी-40 प्रकल्प, मका-30, तूर-2, मूग-5, उडीद-1 तर सोयाबीनचे-2 प्रकल्प अधिक उत्पन्नवाढीसाठी घेण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकल्पामध्ये 25 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना देखील बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पातंर्गत शेतकऱ्यांना बियाण्याबरोबरच बिजप्रक्रिया, रासायनिक खताचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन आणि पणन व्यवस्था याचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.

शेतकरी बांधवांना कृषी विद्यापिठाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण बोली भाषेत एकूण 48 गावात शेतकरी शेतीशाळा घेण्यात येत असल्याची माहिती देतांना तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. तालुक्यातील जवळपास 87 गावाताील सुमारे 2940 शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा लाभ देण्यात येणार असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!