तामसवाडी येथे जंतनाशक गोळी वाटप सप्ताहास आरंभ
तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि [राजेश वसंत रायमळे]
तामसवाडी ता.रावेर येथे काल दि. २१/०९/२०२१ पासून जंताचा प्रादुर्भाव रोखणे कामी जंतनाशक गोळीवाटप सप्ताहास आरंभ करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,काल दि.२१/०९/२०२१ रोजी जि.प.मराठी मुलांची शाळा तासवाडी येथे जंतनाशक गोळीवाटप मुख्याध्यापक माने गुरूजी यांचे हस्ते करण्यात आली.
यावेळी जंतनाशक गोळ्यांचे महत्व विषद करतांना मुख्याध्यापक माने गुरूजी म्हणालेत की,जंताचा प्रादुर्भाव झाल्यावर मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्याच्यामध्ये कुपोषण रक्ताशय होऊन सतत थकवा जाणवतो,त्यांचा शारिरीक व मानसिक विकास पुर्णपणे होत नाही.
“मात्र जंतांचा प्रादुर्भाव थांबवणे सोपे आहे.जंतनाशक गोळी सेवन केल्यास आपण तो पुर्णपणे रोखू शकतो.म्हणून दि.२१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर जंतनाशक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त वय वर्ष ०१ ते१९ वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी सर्व शाळांमध्ये व आंगणवाडी केंद्र येथे निशुल्क गोळीवाटप होणार आहे.
पुढे ते म्हणालेत की, ज्या मुलामुलींना २१ सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळी घेता आली नाही.त्यांना दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी गोळी देण्यात येईल.
यावेळेस त्यांना सहअध्यापक भुषण गवारे गुरूजी यांचेकडून मोलाचे सहकार्य मिळाले.