श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव शांततेत साजरा करा – ए टी पाटील
पारोळा प्रतिनिधी –
पारोळा शहराचे आराध्य दैवत प्रति तिरुपती बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सवाला येत्या तीन तारखेपासून सुरूवात होत आहे.उत्सवात कोणतीही बाधा, समस्या निर्माण होणार अथवा गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी व उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन श्री बालाजी संस्थानाचे विश्वस्त तथा माजी खासदार ए टी पाटील यांनी केले.
श्री बालाजी संस्थानाचा सभागृहात आगामी ब्रह्मोत्सव, रथोत्सव संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी संस्थानाचे विश्वस्त डॉ.नवनीत गुजराथी,अध्यक्ष भैय्यासाहेब शिंपी,अरूण वाणी, डॉ मंगेश तांबे,तहसीलदार डॉ उल्हास देवरे,मुख्याधिकारी किशोर चव्हाण,पोलीस निरीक्षक सुनिल पवार,वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता विजय सहारे,डॉ अनिल गुजराती, रावसाहेब भोसले,दिनेश गुजराती,प्रकाश शिंपी,रमेश भागवत आदी उपस्थित होते.
विश्वस्त ए टी पाटील यांनी ब्रह्मोत्सव नियोजन संदर्भात सविस्तर माहिती व मार्गदर्शन करुन उत्सवात येणाऱ्या अडीअडचणी समस्या मांडल्या व जाणून ही घेतल्या.लेझीम मंडळांना येणाऱ्या समस्यांबाबत विविध विषयांवरती चर्चा करून योग्य मार्गदर्शन व सूचना केल्या. रथोत्सवाच्या पूजनास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेसह मान्यवर उपस्थिती देणार आहेत तर ब्रह्मोत्सवात ‘श्रीं’ च्या निघणाऱ्या वहनांच्या आरतीसाठी विविध मान्यवरांची रेलचेल असते.परंतु हा मान सर्वसामान्यांना देखील
मिळावा म्हणून लकी ड्रॉ सिस्टम ने भाविकांची नाव काढून त्यांनाही ‘श्री’ च्या वहनाचा आरतीचा मान दिला जाणार असल्याची माहिती विश्वस्त तथा माजी खासदार ए टी पाटील यांनी यावेळी दिली.यावेळी लेझीम मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह पदाधिकारी,हमाल वर्ग,चोपदार उपस्थित होते.