पारोळा येथे कानुबाईच्या जागर….
“कानबाई माता की जय” ने शहर दुमदुमले ; महिला मंडळाने घेतला झिम्मा फुगडी चा आनंद
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
पारोळा शहरात खान्देश कुलस्वामिनी कानुबाई माता उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.”कानबाई माता की जय” च्या गजराने पारोळा शहर दुमदुमून महीला,तरूण – तरुणी व भाविकांनी झिम्मा फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.
खान्देश कुलस्वामीनी श्री कानबाई माता उत्सव संपूर्ण खान्देशात साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच देवी च्या दर्शनासाठी जिल्ह्यासह पर प्रांतातून नागरिकांची उपस्थिती होती.शनिवारी देवीचे रोट, रविवारी स्थापना आणि सोमवारी विसर्जन मिरवणूक काढून शांततामय वातावरणात देवीला निरोप देण्यात आला.
यावर्षी शहरात राम मंदीर चौक, बहिरम गल्ली,व्यंकटेश नगर, बागवान गल्ली,हत्ती गल्ली, खांडेकर वाडा,मोरफळ गल्ली, गढरी गल्ली,लवण गल्ली, आझाद चौक,झपाट भवानी चौक,राजीव गांधी नगर,गोंधळ वाडा,गुरव गल्ली,पेंढारपुरा,कोष्टी गल्लीसह आदी ठिकाणी साठचा वर कानबाई मातेची स्थापना यावेळी करण्यात आली होती.या उत्सवा निमित्त जिल्ह्यासह पर प्रांतातून नागरिकांची उपस्थिती होती.सोमवारी सकाळी ९ वाजेपासुन ते दुपारी २ वाजे पर्यंत डी जे व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.उत्सवात दहा ते बारा हजारावर नागरिकांनी गर्दी झाली होती.देवीच्या नामाचा सर्वत्र जागर होऊन जल्लोष साजरा करण्यात आला.उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, गोपनीय शाखेचे महेश पाटील, आशिष गायकवाड,राहुल कोळी, हेमचंद्र साबे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
- उत्सवात रंगत
- दरम्यान सर्वत्र नागपंचमी नंतरच्या येणाऱ्या रविवारी हा कानबाई माता उत्सव साजरा केला जातो मात्र नागपंचमी नंतरच्या या येणाऱ्या रविवारी एकादशी असल्याने काही नागरीक संभ्रमात पडले,अनेक ठिकाणीं गेल्या मागिल रविवारी शहरात व ग्रामीण भागात हा उत्सव साजरा झाला.यामुळे उत्सव झालेल्या अनेक ठिकाणांहून कानबाई मातेला अनेकांनी पारोळा शहरात पाहूनिन म्हणुन आणुन स्थापना केली होती यामुळे उत्सवात अधिक रंगत वाढली होती.
- पालिकेकडून खड्ड्यांची डागडुजी
- शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पाइपलाइनचे काम सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते. पाइपलाइनची खोदून वर आलेली माती व झालेल्या खड्ड्यांमुळे नागरीकांना अडथळे निर्माण झाले असते तसेच उत्सवात महीला,तरूण तरुणी व भाविकांना कोणतीही अडचण अथवा त्रास होऊ नये याचा विचार करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी कर्मचाऱ्यांना आदेश देऊन अनेक ठिकाणांहून ती खोदलेली माती उचलली तसेच ज्या मार्गाने कानबाई माता विसर्जनासाठी जाते अशा ठिकाणीं त्यांनी रस्त्यांवरील खड्डे मुरुमाने बुजवत सपाटीकरण केल्याने अनेकांनी मुख्याधिकारी ज्योती भगत यांचे आभार व्यक्त केले.