घरोघरीसह सार्वजनिक मंडळांत गणरायाची जल्लोषात स्थापना : नागरिकांमध्ये उत्साह….

पारोळा – ( प्रकाश पाटील )

शहरासह तालुक्यात गणरायाचे घरोघरी मोठया भक्तीभावाने गणरायाची स्थापना करण्यात आली तर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळात राजकिय नेत्यांसह मंडळातील पदाधिकाऱ्यांनी,विधीवत पुजा करुन गणरायाची स्थापना करण्यात आली.

शहरातील नगरपालिका चौक , तलाव गल्ली ,बाजार पेठेत नागरिकांनी गणेश मूर्ती सह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर गणेशोत्सव यंदा मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे.यानिमित्त संपूर्ण जिल्हयात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.पारोळा शहरासह तालुक्यात देखील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र बघावयास मिळाले
यंदा शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र शाडू मातीच्या मुर्त्यांची किंमत महागल्याने घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना पसंती देण्यात येत आहे.ढोल ताशांच्या व बँन्डच्या गजरात यावेळी नागरिकांनी वाजत गाजत गणेश मूर्ती आपल्या घरी तर सार्वजनिक मंडळानी मंडळाच्या ठिकाणी केली असून या माध्यमातून बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

शहरात आतापर्यंत जवळपास अधिक मंडळांनी परवानगी घेतली असून गणेशोत्सवासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलिसांचा तसेच होमगार्ड यांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!