पारोळ्यात जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
एकात्मिक बाल विकास सेवा योजना पारोळा तसेच तालुका विधी सेवा समिती व तालुका महिला वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ वैशाली नेरकर मॅडम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समिती व तालुका महिला वकील संघाच्या ॲड श्रीमती आफ्रे मॅडम,ॲड श्रीमती स्वाती शिंदे मॅडम होते.
सुरुवातीस उपस्थित महिलांचा हस्ते राजमाता जिजाऊ,सावित्री बाई फुले,राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी महिलांवर होणार्या अत्याचार व अन्याया विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ नेरकर मॅडम यांनी व्यक्त केले.श्रीमती एच एस पाटील व कुमावत सर यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले.
बाल विकास प्रकल्प अधिकारी एम एस कुलकर्णी मॅडम यांनी प्रास्ताविक सादर केले व तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना पारोळा कार्यालयातील पर्यवेक्षिका सी एम पाटील मॅडम यांनी महिलांना शासकीय योजने विषयी माहिती दिली.सपकाळे मॅडम,एम डी पाटील मॅडम,व्ही एस बोरसे मॅडम,व्ही एम पाटील मॅडम यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी शहरातील व तालुक्यातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल सोनवणे यांनी केले तर आभार व्ही एम पाटील मॅडम यांनी मानले.