राज्यस्तरीय निबंध व काव्य गायन स्पर्धेत खान्देशची कन्या अनुपमा जाधव सर्व प्रथम

पालघर-

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा येथे या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवित जात असतात. पर्यावरण विषयावर आधारित…
या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे कार्य करणारी ही संस्था,त्यात विविध कार्यक्रम होत असतात.
आॅनलाईन पध्दतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यात के.एल. पोंदा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर येथील शिक्षिका
अनुपमा यांनी राज्यस्तरावर निबंध लेखनात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच काव्य गायन स्पर्धेत देखील राज्यस्तरावर प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला त्यांच्या या उत्तुंग यशामुळे शिक्षक, सहकारी, पालक , विद्यार्थी व परीसरातून अभिनंदन होत आहे.
यापूर्वी देखील त्यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यासाठी विविध पारितोषिके प्राप्त झाली आहे. निबंध लेखन , कविता वाचन, कविता गायन
यासाठी सतत त्यांनी प्राविण्य मिळवले आहे.निबंध लेखनासाठी व काव्य गायनासाठी परीक्षक म्हणून स्नेहलता चौधरी (महिला महासचिव नेफडो),स्वाती सोनवणे,डॉ. मृगनयना जाधव.
शीतल राऊत यांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी,नेफडोचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी आनंद व्यक्त केला. यात सुयोग धस (संस्थापक अध्यक्ष नेफडो) प्रा. दिपक भवर, ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नेफडो)हरीविजय देशमुख,माई लताश्री वडनेरे सचिन वाघ,निता लांडे, डाॅ. प्रिती तोटावार,अभय खेडकर,प्रकाश कदम, बापू परब,सरीता मंडाणी
या सर्वांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!