आयुष्मान भारत डिजिटल अभियान सुरु केल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
नवी दिल्ली
‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियानाचा शुभारंभ केल्याबद्दल, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे. याबद्दल केलेल्या टवीटमध्ये अमित शाह म्हणाले- फदेशातील सर्व नागरिकांना आरोग्य, सुरक्षा आणि प्रतिष्ठेचे आयुष्य देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. याच दिशेने आज ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियानाचा शुभारंभ केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.ङ्ग
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी झाल्यानंतर आता ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियान सुरु केले असून यातून पंतप्रधानांची निरोगी भारताच्या निर्मितीसाठीची कटिबद्धताच व्यक्त होते. डिजिटल आरोग्य व्यवस्थेचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियानामुळे’ देशात आरोग्य विषयक माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी एक सुलभ ऑॅनलाईन प्लॅटफॉर्म निर्माण झाला असून, त्याद्वारे, एका क्लिकवर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.ङ्ग, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे.