खड्ड्यांमुळे कार झाली आऊटऑॅफ कंट्रोल, लहान मुलांसह 4 जणांचा चिरडले, नागपूरमधील घटना
नागपूर,
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनियंत्रित झालेल्या भरधाव कारने चार प्रवाशांना चिरडल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील सातनवरी इथं ही घटना घडली आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावरून जात असताना मारुती कारचे अचानक खड्डे समोर आल्यामुळे नियंत्रण सुटले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला काही मुलं बसची वाट पाहत होते. भरधाव वेगात असल्यामुळे कारचे खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटले आणि तिने रस्त्यावर असलेल्या पाच जणांचा चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, चार जणांना चिरडून काही अंतरावर जाऊन कार पलटी झाली.
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. गौतम सालवनकर (वय 45) , शौर्य सुबोत डोंगरे (वय 9), शिराली सुबोत डोंगरे (वय 6), चीनू विनोद सोनबरसे (वय 13) यांचा अपघातात मृत्यू झाला तर ललिता बाबूलाल सोनबरसे गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खड्डयांबद्दल वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने चार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये रस्ते दुरुस्त न केल्याच्या कारणावरून एका इसमाने गडकरी यांच्या घरोसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. विजय पवार असं पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहे.
त्याने नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घरासमोर आत्महदहनाचा प्रयत्न केला. पवार याने गडकरी यांना विनंती केली होती की रस्ते व रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे. याबद्दल त्याने निवेदनही गडकरींना दिलं होतं. एवढंच नाहीतर विजय पवार याने महाराष्ट्राच्या खराब रस्त्यांची अवस्था सुधारले नाहीत तर आत्मदहनाचा इशाराही याआधी दिला होता.