। वंदे श्रीचक्रधरम् । – ।।”स्मरण”एक चिंतन।। –

युवा संत प्रदीप महाराज पंजाबी

खिर्डी खुर्द ता.रावेर जि. जळगाव

“स्मरण”म्हणजे आठवण.या संसारात अनेक प्रकारचे प्राणी आहेत.तर या सर्व प्राण्यांन पैकी कोणता प्राणी आठवण करु शकतो?तर तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आठवण करू शकतो,

या संसारातीलच मनुष्याने नेमकी कोणाची आठावण केली पाहिजे?कारण संसारात वावरतासंना या मनुष्याला अनेक जड,चेतनपदार्थ आदि वस्तुची ओळख झालेली असते.
मग या संसारातील जडचेतन पदार्थ जीवाला भवसंसरातून तारणार आहेत काय?
ज्याला परमार्थाची ओळख झालेली आहे.तर त्याच्या लक्षात येईल की,या भौतिक वस्तू मनुष्याला या भवसंसारातून तारु शकत नाही.
चेतन वस्तुपैकी आपण आईवडलांची आठवण करतो. या आईवडिलांच्या आठवणीने फार तर ते आपणाला भौतिक गरजा परवू शकतात. त्यामधे कपडे, भोजन, शिक्षण घेत असेल,तर शैक्षणिक खर्च फार ते पुरवू शकतात.पण त्यांच्या या आठवणीने,या भवसागरातून तरुन जाऊ शकत नाही,हे मात्र निश्चित आहे.
हा जीव सतत भौतिक वस्तूची आठवण करीत राहिला,तर या भवसंसारातून तरुन जाऊ शकतो का?या प्रश्नाचे ऊत्तर आहे, तो तरुण जाऊ शाकत नाही.

मग कोणाच्या आठावणीने या भवसंसारातून तरुन जाऊ शकतो.तर या सृष्टिचा मालक चालक,पालक,परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी ज्यांना जीवोद्धरण्याचे व्यसन आहे. अशा परमेश्वराची आठवण जर केली,तर निश्चित आत्मकल्याणा झाल्या शिवाय रहाणार नाही.

या कलीयुगातील सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामीं अवताराची किती महान विषेशता आहे.
या संसारात इतक्या देवीदेवतांचे अवतार झाले आहे.पण कोणत्या देवीदेवता जीवाच्या भल्याची कळजी घेतांना दिसत नाही.
एकच असा परब्रम्ह परमेश्वर अवतार आहे.तो म्हणजे श्रीचक्रधर स्वामी!तोच परमेश्वर अवतार जीवाच्या भल्याची काळजी घेतांना दिसत आहे..

ती काळजी पुढील प्रमाणे!परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामीजवळ असलेला परिवार “त्यामधे असलेली महादाईसा स्वामींना प्रश्न करते?
जी..जी.. आम्ही गोसावीयातें चींतुः गोसावी काई चीतींती?
गोसावी म्हणती!बाई हे सकळ जीवाते चींतीःकदाचीत बाईसे प्रश्नु करीतिःबाबाःआम्ही बाबाते चींतुःबाबा काई चींतीतिः बाईःहे श्रीप्रभुची थापु चींतिः
आमुचे स्वामीं नरकातल्या जीवापासून तर किड्यामुंगी तथा मनुष्य जातीपर्यंत सकळ जीवांचे चिंतन करीत असतात.
म्हणून या ब्रम्हांडातला असा एकच परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी आहे,
जो विषेशरुपाने सर्व जीवांच भले एवं कल्याण चींतीत आहे.
श्रीचक्रधर स्वामीचे आपल्या वर अंनत ऊपकार आहे की,जो परमेश्वर अवतार आपले भल चिंतींत आहे.आमुचे स्वामी प्रातःकाळी ऊठून या सृष्टीतील सकळ जीवांच चितन करतात.
मग निदान आपण पश्चातप्रहारी ऊठून बसले पाहिजे.जेणे करून परमेश्वराची कृपादृष्टी आपल्या वर पडली पाहीजे.
त्या परमेश्वराची प्रातःकाळी ऊठून आठवण केली पाहिजे.कारण परमेश्वराचे पश्चातप्रहारी आवलोकन चाललेले असते.जर आपण सकाळी लवकर ऊठून बसलो.
तर त्या परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर निश्चित पडल्या शिवाय राहाणार नाही. परमेश्वराची कृपा दृष्टी जीवाने आपल्यावर पडण्याची काळजी घेतली पाहीजे
या साठी वासनीक बंधूनी प्रातःकाळी लवकर ऊठून परमेश्वर स्मरणाकडे लक्ष लवले पाहिजे.एवं परमेश्वराची आठवण केली पाहिजे.तर तो परब्रम्ह परमेश्वर आपली आठवण ठेवील. तरच परमेश्वर तुमची अंतकाळाच्या वेळेस तुमची आठवण ठेवल्या शिवाय राहानार नाही.तुम्ही जसी परमेश्वराची आठावण ठेवता तसी तो परमेश्वर तुमची आठवण ठेवत असतो.म्हणून आठवण एवं स्मरण देवाचे करीत राहावे. कामात असो,किंवा भोजन घेत असो. झोपत असतांना!ऊठतांना बसतांना परमेश्वराचे स्मरण सतत करत राहावे.
ही साधना तुम्हाला परमेश्वररूपी साध्याला पोहचवल्या शिवाय राहाणार नाही. निश्चितच परमेश्वर प्राप्त करुनच देईल.
म्हणून आठवण ही शाश्वत प्राप्ती करुन देणाऱ्या परमेश्वराची करावी.
असो!

लेखक:-महानुभाव पंथीय लेखनकर्ते आहेत

युवा संत प्रदीप महाराज पंजाबी
श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द ता.रावेर जि. जळगाव

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!