नाभिक सेवा संघाच्या वतीने शिवरक्षक जिवाजी महाले जयंती साजरी

जालना ( प्रतिनिधी),

येथील परिसरातील यशवंतनगर वसाहतमधील नाभिक सेवा संघ कार्यालयात जिवाजी महाले जयंती साजरी करण्यात आली.
प्रथमतः शामसुंदर जी वाघ यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाभिक सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस सेनाजी काळे यांनी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफ़जल खानाच्या सय्यद बंडा नावाच्या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. शिवरक्षक जिवाजी महाले यांनी सय्यद बंडाशी दोन हात करून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण *माँ जिजाऊ साहेबांच्या त्यांच्या तोंडून पडलेले हे उद्गार या प्रसंगावरून पडली आहे. जिवाजी महाले हे दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता. अशी थोडक्यात माहिती दिली.
यावेळी नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख नगर हर्षद शिर्के पाटील,किरण चव्हाण, योगेश ढगे, संतोष खाडे, सुधीर श्रीरंगम, सावता रासवे, राधाकिशन मंजुळ, शांताराम ग्राम, भारत काळे, राहुल मुंडें, गणेश तांदळे, वैभव राऊत, भारत चोरमारे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!