अ.भा. शिक्षक मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी दत्ता घायाळ तर ज्ञानेश्वर घुमरे सरचिटणीस

जालना,

अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अ.भा.मराठा शिक्षक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी दत्ता घायाळ यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बालाजी माने यांनी दत्ता घायाळ व ज्ञानेश्वर घुमरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत शुक्रवारी ( ता.15)

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या सुचनेनुसार सदर नियुक्त्या केल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासह संघटना वाढीसाठी प्रयत्नशील रहावे. असे जिल्हाध्यक्ष बालाजी माने यांनी नियुक्ती पञात नमूद केले असून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अशोक पडूळ, संतोष कर्‍हाळे, अ‍ॅड. शैलेश देशमुख, शुभम टेकाळे यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते,व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!