रासी सिडस कंपनी चा स्तुत्य उपक्रम. कृषी ला आरोग्याची जोड.
जळगाव प्रतिनिधी- दि. ५-
आज दि. ५ ऑगस्ट रोजी बियाणे क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रासी सिड्स प्रा. लि. यांनी जळगांव जिल्ह्यामध्ये पुढील एक वर्ष करीता फिरत्या दवाखान्याला सुरुवात केली आहे.
या उपक्रमात, एक पूर्ण वेळ डॉक्टर, फार्मसिस्ट, अँबुलन्स, व ड्रायव्हर यांच्या मदतीने जळगांव जिल्ह्यातील गावागावात जाऊन वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत एका गावात २-३ वेळा जाऊन फेरतपासणी व उपचार केले जातील ज्यात सर्व वर्गातील लोकांचे शुगर टेस्ट, बीपी टेस्ट, हिमोग्लोबिन चाचणी व इतर सर्व प्राथमिक तपासणी करून व्हॅन मार्फतच मोफत औषधी देऊन उपचार केला जाईल.
या मोफत फिरत्या दवाखाना गाडीचे उद्घाटन मा. ना. गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगांव, यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी श्री. एन.एस. चव्हाण, सिव्हील सर्जन, जळगांव, मा. कैलास चौधरी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगांव, रासी सिड्स चे डिव्हीजनल बिझनेस मॅनेजर श्री सुनिल महाजन, डिविजनल क्रॉप मॅनेजर श्री मिलिंद चव्हाण, रिजनल बिझनेस मॅनेजर अखिल प्रताप सिंग, रासी सिडस चे गोपाल पाटील, समाधान खैरनार, अनंत बोदडे, प्रतीक पाटील, ज्ञानेश्वर महाजन व वितरक श्री कैलास मालू, श्री प्रमोद पाटील, श्री किरण नेहेते, श्री राजीव जाजू, श्री योगेश लोढाया उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्र्यांनी यांनी रासी सिड्स च्या उपक्रमाचे कौतुक केले व कृषी ला आरोग्याची जोड या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल अशी आशा व्यक्त केली.