चोपडा तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायतीचे निवडणुक निकाल जाहीर….
चोपडा प्रतिनिधी –
तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धामधूम आज निकाल जाहीर झाल्यानंतर थंड झाली यात धुपे बुद्रुक, तावसे बुद्रुक व घुमावल येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने फक्त 19 गावांची निवडणूक लागलेली होती
यात निवडणूक जरी चुरशीची झाली तरी देखील वर्चस्व कोणत्याही पक्षाला घेता आला नाही उमेदवार स्वबळावर निवडणूक लढले त्यामुळे चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल संमिश्र लागल्याचे चित्र दिसून आले
अडावद येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून तडवी बबनखा लालखा यांना 4110 मत मिळाले असून ते 1265 निवडून आले तावशे खुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून पाटील कल्पनाबाई शांताराम यांना 373 मतं मिळाली असून ते 81 मतांनी निवडून आले गणपुर येथील लोकनियुक्त भिल भूषण मोतीलाल यांना 16 62 मते मिळालेले असून 183 मतांनी ते निवडून आलेले आहेत तालुक्याभरात सर्वात कमी वयाच्या सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे विचखेडा येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना 512 मत मिळालेले असून ते 12 मतांनी निवडून आले आहेत अनुवरदे खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून शिरसाट सचिन प्रल्हाद यांना 700 मत मिळाली असून ते 223 मतांनी निवडून आलेले आहेत मालखेडा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी पाटील गणेश लोटन यांना 322 मिळालेली आहेत व ते 39 मतांनी निवडून आलेले आहेत वाळकी येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून कोळी रूखमाबाई वसंत यांना 518 मत पडली असून 252 मतांनी निवडून आलेले आहेत कठोरा येथील लोकनियुक्त सरपंच कोळी एकनाथ दामू यांना 589 मतं मिळालेली असून ते 280 मतांनी निवडून आलेले आहेत वडती येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून धनगर देविदास हरिश्चंद्र यांना 847 मत मिळालेली असून 53 मतांनी ते विजयी झालेले आहेत वडगाव बुद्रुक येथील लोकनियुक्त सरपंच पाटील प्रतिभा गणेश यांना 815 मतं मिळालेले असून ते एक मतांनी निवडून आलेले आहेत वडगाव येथील फेर मतमोजणीत देखील पाटील प्रतिभा गणेश हेच निवडून आल्याने आनंद द्विगणित झाला होता वराड येथील लोकनियुक्त सरपंच म्हणून गवळी अजय ईश्वर यांना 508 मत मिळालेले असून 245 मतांनी ते निवडून आलेले आहेत पारगाव येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी इंगळे वंदनाबाई प्रकाश यांना 467 मते मिळालेली असून 66 मतांनी ते निवडून आलेले आहेत लासुर येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल नर्मदाबाई भिवसन यांना 2337 मत मिळालेली असून ते 42 मतांनी निवडून आलेले आहेत आडगाव लोकनियुक्त सरपंच पदासाठी बिल भारतीय राजेंद्र यांना 802 मत मिळालेली असून ते111 मतांनी निवडून आले आहे विष्णपूर येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल जगदीश रामदास यांना 392 मतं मिळालेली आहेत ते 31 मतांनी निवडून आलेले आहेत अंबाडे येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी बिल शुभांगी सुनील यांना 656 मत मिळालेली असून ते 224 मतांनी निवडून आलेले आहे नरवाडे येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी भिल मंगल रूपसिंग यांना 329 मत मिळालेले असून ते 48 मतांनी निवडून आलेले आहेत कोळंबा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी वाल्मीक मधुकर बाविस्कर यांना 963 मतं मिळालेली असून 504 मतांनी ते निवडून आले आहेत सुटकार येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी ठाकरे रवींद्र भगवान यांना 410 मत मिळालेले असून ते 49 मतांनी निवडून आलेले आहेत
घुमावल येथील एसटी राखीव जागा असल्याने येथून सरपंच पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सरपंच पद रिक्त आहे तसेच तावसे बुद्रुक येथे बिनविरोध निवडणुक झाल्याने सरपंच पदासाठी चौधरी रेखा किशोर यांना बिनविरोध म्हणून निवडून दिलेले आहे व धुपे येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने सुखराम भिवसन अहिरे यांना गावकऱ्यांनी सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून दिलेले आहे
= सकाळी दहा वाजेपासून मत मोजणीला सुरवात झाली मात्र दुपार 3 वाजेपर्यंत पत्रकारांना आकडेवारी देण्यात आले नाही त्यामुळे पत्रकार देखिल नाराज होते.
= मत मोजणी सुरू असताना दुपारी काही निकाल नंतर गर्दी झाली भुसावळ येथील दोन इसम आपली हात सफाई करताना रंगेहाथ सापडल्याने पोलीसांनी चांगलच चोप दिला
= वराड येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोळी अंबादास दयाराम व चित्रगथी गजानन मंगल ह्या दोघ उमेदवाराना सारखी म्हणजे 152 /152 मत मिळाली होती त्यामुळे या जागेसाठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली त्यात कोळी अंबादास दयाराम हे निवडून आले आहेत. त्याच धर्तीवर अडावद येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये पाटील छोट्याबाई नरेंद्र व शकिलाबी मूनसाफखा पठाण ह्याना दोघांना 511/511 मत मिळाली होती यात देखिल ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली यात शकिलाबी मूनसाफखा पठाण ह्या निवडून आलेल्या आहेत.
यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.