धुळे येथे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय द्यावे व मा.न्यायमूर्ती हरदास समितीचे माध्यमातून काढलेले परिपत्रक त्वरित रद्द करावे. जळगांव जिल्हा ठाकुर समाज सेवा मंडळाची मागणी -भुसावळ प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ अन्यायग्रस्त आदिवासींच्या विरोधात षडयंत्र करणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा जाहीर निषेध करीत शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काढलेले ७ जून आणि २० मे २०२१ चे पत्र मागे घ्यावे या मागनीचे निवेदन जळगांव आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने मा.मुख्यमंत्री व मा.राज्यपाल यांच्या नांवाने भुसावळचे उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांना देण्यात आले.
मा.न्यायमूर्ती पी व्ही हरदास समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी नुसार दि.७ जून २०२१ ला आदिवासी विकास विभागाने काढलेले शासन परिपत्राद्वारे अनुसूचित जाती/जमातीचे लोकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करतांना येत असलेल्या अडचणींना दूर करण्याऐवजी त्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेल्या आहेत.जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी,उपाययोजना होण्याऐवजी सर्वच प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट केलेली आहे.यामुळे आदिवासी उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक शोषण करणारी आदिवासी विकास विभागाचा व्यवस्था अधिकच निर्ढावणार आहे. म्हणून या निर्णयचा महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळा तर्फे जाहीर निषेध नोंदविला आहे.सदर निर्णय त्वरित मागे घेणेत यावेतअशी मागणी करण्यात आलेली आहे.
तर दि.१३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार धुळे येथे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे मंजूर कार्यालयाचे मुख्यालय परस्पर नंदुरबार येथे हलविणेबाबत आदिवासी विकास विभागाचा दि.२०मे २०२१ शासन निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जळगांव धुळे जिल्ह्यातील आदिवासिं च्या सोयीचे तपासणी समितीचे कार्यालय धुळे येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गोपाळ ठाकुर, तालुकाध्यक्ष मुन्ना ठाकुर, नगरसेवक दुर्गेश ठाकुर, दत्तु ठाकुर, सौरभ ठाकुर आदींनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने
यांच्याशी सविस्तर चर्चा करीत प्रांताधिकारी यांना याबाबत चे निवेदन दिले आहे.
शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आम्ही दैनिक "महाराष्ट्र सारथी" व साप्ताहिक "अनमोल मत" या नावाने मराठी अंक सुरू केलेले आहेत.
सदर अंक जळगाव,धुळे ,नंदुरबार, नाशिक, या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येतो.
आपल्याकडे आपण केलेले काही चांगले कार्य, लेख, कविता ,माहिती, आयुर्वेद,सौंदर्याविषयी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्या विषयी जनजागृती करायची असल्यास आम्हाला खालील व्हाट्सअप नंबर वर माहिती पाठविल्यास आम्ही मोफत प्रसिद्धी देवु.
सदर लेख पाठवताना टाईप करून (फोटो असल्यास) अवश्य पाठवावे
आपला शुभचिंतक
शैलेंद्र विठ्ठल ठाकूर
कार्यकारी संपादक
जळगाव
🪀9860085700