वरणगावातील रोहित जैन सर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत भारतात सर्व प्रथम ओटीटी प्लॅटफॉर्म केला विकसित

भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव शहरातील रोहित रेफ्रिजरेशन टीव्ही शोरूम व्यवसायिक सुनील जैन यांचा मुलगा रोहित सुनील जैन यांनी वरणगाव शहराचे नाव हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील शिक्षण क्षेत्रात वरणगाव चे नाव हे शिखरावर नेत शैक्षणिक क्षेत्रात प्रथमता मजल ही मारलेली आहे
आज पावतो चित्रपट वेब सिरीयल मालिका खेळाचे सामने बघण्यासाठी
ओटिटि प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जात असे परंतु रोहित जैन यांनी आपल्या बुद्धिमत्तेला चालना देत दुसरी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना संपूर्ण विषयाचे शिक्षण हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करत व ते हि अगदी निशुल्क मिळणार आहे
सध्या अगम वॉच लर्न अँड अप्लाय या नावाने ओटिटि प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आला असून यासाठी युजर्सकडून रजिस्ट्रेशन फी ही घेतली जाणार नसून पूर्णता निशुल्क आहे अशी माहिती रोहित जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहे
रोहित जैन यांचे शिक्षण हे ऑडनस फॅक्टरी वरणगाव येथील
केंद्रीय विद्यालय येथे पहिली ते दहावीपर्यंत व राजस्थान कोटा येथे अकरावी बारावी पर्यंत झाले व पुढील उच्च शिक्षणासाठी B. Tech (I T ) त्यांनी मुंबई येथील के जे सोमय्या कॉलेज येथे पूर्ण केले

रोहित सुनील जैन या तरुणाचा आदर्श घेऊन इतर वरणगाव व परिसरातील तरुणांनी आपल्यातील असलेल्या कलागुणांना कठोर मेहनत घेत रात्रीचा दिवस करत जागृत केले पाहिजे असे कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी तरुणांना उद्देशून प्रोत्साहन देण्यात आले
ओटिटि प्लॅटफॉर्मवर शैक्षणिक क्षेत्राचा उगमस्थान म्हणून आता भारत देशात वरणगाव शहराचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाणार हे वरणगाव वासीयांसाठी कौतुकास्पद व अभिमानाचा विषय होत प्रतिष्ठिताकडुन कडून उच्चारले जात आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!