बलवाडी पूरी रस्त्याकडे प्रशासनाच लक्ष लागेल का ? ग्रामस्थांची मागणी…

बलवाडी प्रतिनिधी -(आशिष चौधरी )

सविस्तर वृत्त असे की बलवाडी पूरी रस्ता हा काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता परंतु काही महिन्यात रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यात मोठी मोठी खड्डे पडलेले दिसून येत आहे तसेच या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते वाहन चालवताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते आणि खड्डे चुकवीत असताना एखादा अपघात होण्याची दाट शक्यता असते. या रस्त्याच्या बाजूलाने सुकी नदी वाहत असते. या वर्षि पाऊस जास्त झाल्यामुळे नदीला पाणी जास्त असल्यामुळे नदीकाठावरील माती धुतली जात आहे. यात शेतकरी बाईक वरती शेतीचा सामान घेऊन जात असतात. याच रस्त्याने सृंगरूशि मंदिरही आहे लांब लांब वरुन भाविक भक्त दर्शना घ्यायला येत असतात. आणि या पडलेल्या खड्ड्यांमुळे जर एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अशी ग्रामस्थांच मत आहे. हा रस्त्याचे त्वरित काम करून होणाऱ्या अपघातापासून वाहनधारकांना वाचवा अशी ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची मागणी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!