भुमिराज नागरी सहकारी पतपेढी मर्या. अंमळनेर पतसंस्थे मार्फत सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध… चेअरमन विजय ठाकूर

दैनिक महाराष्ट्र सारथी अमळनेर प्रतिनिधी

✍🏻 अमळनेर शहरांमध्ये 1 जुलै रोजी भुमिराज नागरी सहकारी पतपेढी मर्या. अंमळनेर जिल्हा जळगाव या शाखेचे शुभारंभ उद्घाटन संपन्न झाले.
अत्यंत अल्प दिवसांमध्ये भूमिराज नागरी सहकारी पतसंस्थेवर व पदाधिकारी सदस्यावर विश्वास ठेवत असुन अमळनेर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, व मित्र मंडळी, पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवीत आहेत. पतसंस्थेचा शेअर सभासद होण्या करिता शेअर चा दर कमीत कमी ठेवल्यामुळे शेअर सभासदांची संख्या सुद्धा वाढत आहे, त्यामुळे पतसंस्थेचे चेअरमन विजय ठाकूर यांनी अमळनेर करांचे आभार मानले असुन ठेवी व कर्ज संदर्भामध्ये नागरिक व बेरोजगार युवकांनी संस्थेला भेट द्यावी व पतसंस्थेच्या योजना समजून घ्याव्या. असे नागरिकांना आव्हान सुद्धा केलेले आहे.

सदर गुंतवणुकीवर चांगला परतावा सुद्धा पतसंस्थेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
भूमिराज नागरी सहकारी पतपेढी च्या माध्यमातून गरीब होतकरू मेहनती सुशिक्षित बेरोजगार युवकांना लहान-मोठ्या व्यवसायाकरिता कर्ज स्वरूपात भांडवल सुद्धा पतसंस्थेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

आज दिनांक 22जुलै रोजी भूमिराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवक श्री. संजय पंडित पवार यांना मच्छी व्यवसाय करिता कर्ज स्वरूपामध्ये पहिले लोन देण्यात आलेले आहे.

भूमिराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय ठाकूर, सचिव मुकुंदाराव जाधव, मनोज पवार, व कलीम खाटीक व कर्मचारी वृंद यांनी संजय पवार यांना व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या व व्यवसायाकरिता कर्ज लोन मिळाल्यामुळे पतसंस्थेतील सर्वांचे आभार संजय पवार यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!