भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवार मार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान.

भडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अशोक उतेकर,यांचेसह पोलीस कर्मचारी, पञकार अशोक परदेशी. व पञकारांच्या सन्मानासाठी उपस्थित पदाधिकारी.

दैनिक महाराष्ट्र सारथी भडगाव प्रतिनिधी राजु दीक्षित

भडगाव — जळगाव जिल्हा क्षत्रीय मराठा परीवारामार्फत भडगाव येथे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांचा, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा, समाज सेवक सह पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन क्षत्रीय मराठा परीवाराच्या जिल्हा क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे दि. २४ व २५ रोजी भडगाव पोलीस स्टेशनला व ग्रामिण रूग्णालयात तसेच पत्रकारीत फ्रॅट वर्क लाइन वर कार्य करणारे व समाज सेवक सह कोरोणा योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला. या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.भाउसाहेब पाटील , जिल्हा संपर्क प्रमुख इश्वर पाटील,.जिल्हा कार्यकारी प्रमुख ज्ञानेश्वर भोसले,भडगाव तालुका प्रमुख दिनानाथ पाटील, भडगाव युवक प्रमुख वाल्मीक पाटील, जिल्हा महीला दक्षता प्रमुख गिता पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी भडगाव पोलीस स्टेशन व ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पत्रकार समाज सेवक च्या वतीने संघटनेनी त्यांच्या कार्याची दखल घेतली म्हणुन आभार मानले. भडगाव पोलीस स्टेशनला दि. २४ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. कोरोना विषाणु महामारीच्या संकट काळात आपण कर्तव्यनिष्ट राहुन आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कार्याची दखल घेत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांचेसह पोलीस कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपस्थित भडगाव तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, पञकार अशोक परदेशी यांना ही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अँड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाअध्यक्ष दिनानाथ पाटील, युवक अध्यक्ष वाल्मीक अहिरे आदि पदाधिकार्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार अशोक परदेशी यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अँड. भाऊसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी मनोगतातुन सांगीतले कि, कोरोना काळात पोलीस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता अथक परीश्रम घेतले. जनतेची काळजी घेतांना बंदोबस्तादरम्यान माझ्यासह काही पोलीस कर्मचारीही कोरोना बाधीत झाले. मात्र पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांची दखल घेत आमचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान करण्यात आला. याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनमार्फत क्षत्रीय मराठा परीवाराचे आभार मानतो. असे सांगीतले. तर पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे यांनी आभार मानले. भडगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन केला सन्मान — भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांचेसह आरोग्य कर्मचार्यांचा तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु शेख यांचेसह पञकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा छोटीखानी कार्यक्रम दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालयात पार पडला. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु शेख, माजी अध्यक्ष अशोक परदेशी,हेमंत विसपुते,जावीद शेख,भास्कर शार्दुळ, समाज सेवक महेंद्र ततार,हिरामण बाविस्कर यांना ही कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील सर्वच पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अशी माहीती आयोजकांनी दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!