भुसावळ येथील विजवितरण कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार-आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालेल .आत्ता मागे हटणार नाही …शिवसैनिक

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका प्रतिनिधी

भुसावळ शहर येथील शिवसैनिक संतप्त आज दिनांक 23 जून रोजी शिवसेना भुसावळ शहर अध्यक्ष निलेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालयामध्ये शिवसैनिकांचा ताफा शिवसेना स्टाईलने धडकला

सविस्तर माहिती
महावितरण तर्फे सुरू असलेले सक्तीचे वीज कनेक्शन कट केले जात आहे कोरोना महामारी मुळे जनता त्रस्त असून उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे घर खर्च भागवणे हे जिकरीचे झाले असता अशातच महावितरण कंपनीचे वीज बिलाचे पैसे थकल्यास काही वेळ मुदत नोटीस न देता सरसकट वीज कनेक्शन हे कट केले जात आहे

याबाबतीत शिवसेनेला माहिती तक्रार येताच लागलीच शिवसैनिकांचा ताफा महावितरण धडकला असता तेथील उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जाब विचारण्यात आला
याबाबतीत सक्तीचे विज बिल न थांबल्यास शिवसैनिक हे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार आम्ही जे बोलणार ते करणार
हे सर्व आम्ही जनहितार्थ साठी करत आहोत व करत राहणार कारण आम्ही बाळासाहेबांची कट्टर शिवसैनिक आहोत बोललेल्या शब्दाला आम्ही फिरणार नाही
सक्तीची वसुली ही महावितरण चा आदेश नसतानाही सुरू असून गरीब लोकांना दादागिरी दाखवाल
तर शिवसेना काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ
सक्तीची वसुली ही कर्मचाऱ्यांना लादून दिली असता महावितरण चे वायरमन कर्मचारी हे थकीत करदात्यांना महीला व पुरुष न बघता अरे रावीची भाषा वापरून वसुली ही दांडगाईने करत असतात
करदात्यांना दोन ते तीन टप्प्यांमध्ये बिलाची आकारणी करावी बिलाची आकारणी हे कुणालाही चुकणार नाही परंतु परिस्थिती समजून घेऊन लोकांना सहकार्य करावे व सक्तीची वसुली ही थांबवण्यात यावी
कार्यकारी अभियंता घरुडे यांना निवेदनाद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे इशारा देण्यात आलेला आहे

शिवसेना शहर अध्यक्ष भुसावळ
निलेश महाजन
माजी नगरसेवक दीपक धांडे
वकील कैलास लोखंडे
शिवसैनिक निलेश ठाकूर दिनेश बुंदेले विजय सुरवाडे राहुल सोनटक्के व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!