मेहू ग्रामस्थांकडून गतिरोधकाला झेब्रा क्रॉसिंग पट्टे….
पारोळा प्रतिनिधी –
दिवसेंदिवस रस्ते अपघात दुर्घटनेत वाढ दिसून येते,खराब रस्ता,मोठमोठी खड्डे, जमीनदोस्त अथवा विनादर्शक गतिरोधक आदी कारणांमुळे घटना घडून येतात.यामुळे अनेक जण जखमी तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो.
पारोळा चाळीसगाव रस्त्यावर तालुक्यातील मेहू गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे तसेच विनादर्शक गतिरोधकामुळे अनेक अपघाताचा घटना घडत आहेत,याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांकडून तक्रारही देण्यात आली मात्र संबंधित विभागाकडून याकडे अशम्य दुर्लक्ष करण्यात आले.सदर रस्त्यावरील असलेले गतीरोधक वाहनधारकांना दिवसा व रात्री दिसत नसल्याने तसेच होणाऱ्या अपघाताला आडा बसावा त्यासाठी मेहू गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी गतिरोधकाला स्वतः झेब्रा क्रॉसिंग कलर पट्टे मारले.यावेळी दर्शकता व गतिरोधक दिसून आल्याने वाहनधारकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी आनंदा पाटील,सुनिल पाटील, दिनकर पाटील,भूषण पाटील, बापू पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान यापूर्वीही येथे अपघाताचा घटना घडत होत्या त्यावेळी ही ग्रामस्थांकडून झेब्रा क्रॉसिंग कलर पट्टे मारण्यात आले होते.संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.