परिवार तेलाचे वीस डबे चोरीस – गुन्हा दाखल….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
शहरातील महेश मेगा मार्ट समोरून सुमारे ३३ हजार चारशे रूपये किमतीचे परिवार कंपनीचे सोयाबीन तेलाचे वीस डबे चोरी झाल्याचा प्रकार घडला असुन याबाबत पोलिसांत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष हिंदुजा यांनी पोलिसांत फिर्याद दिली की,आमचा मालकीची महिंद्रा बोलेरो पीक अप क्रमांक एम एच १९ बी एम ३९२१ हीचावर चालक दिनेश चव्हान राहणार जोगलखेडा याने धुळे येथील १५ कीलोचे ११० परिवार कंपनीचे सोयाबीन तेलाचे डबे दिनांक २५ रोजी रात्री साडेआठ वाजता आणुन ती गाडी महेश मेगा मार्टच्या समोर लावुन निघुन गेला होता.दुसऱ्या दिवशी २६ रोजी सकाळी दहा वाजता त्या पिक अप गाडीतून फक्त ९० तेलाचे डबे मिळाले असुन वीस तेलाचे डबे कमी निघाले, आजूबाजूला त्या तेलाचा डब्यांच्या शोध घेतला असता परंतू ते मिळुन न आल्याने याबाबत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.