सिन्नर येथे बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त….
नाशिक प्रतिनिधी – ( राजेंद्र दोंदे )
राज्य उत्पादन भरारी पथक क्रमांक १ नाशिक यांनी दि.२४ रोजी प्रफुल भाऊसाहेब यादव ऊर्फ पप्पु यादव यांच्या मालकीच्या यादव वस्ती निऱ्हाळे, घोटेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक. व धनलक्ष्मी अपार्टमेंट रूम नं.१० व ११ शिवाजी नगर, सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला.
या छाप्यात देशी मद्याच्या १८० मिली च्या ७ गोण्यांमध्ये रिकाम्या १४०० बाटल्या, तसेच ३ देशी दारू भिंगरी ने भरलेल्या सिलबंद बाटल्या, आणि देशी दारू भिंगरी चे ३९० बनावट लेबल, मशिन बुचने तसेच, एक लोखंडी कटर, ६ प्लास्टिक टेप, एक कागदी नोंद वही, तिन डायऱ्या, १५ स्पायनार बायडीग पाकिटे, झेरॉक्स पेपर, देखरेखीसाठी लावलेले सीसीटीव्ही, डी व्हीं डी आर २ नग, इपसॉन कंपनीचे प्रिंटर मशीन, इबल कंपनीचे संगणकाकरिता लागणारे मॉनिटर,२०० ग्रामचे मायक्रोन पेपर, प्लास्टिक डॉपरचे १०० नग, व डायऱ्या असा एकुण १,०८,७००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रफुल भाऊसाहेब यादव ऊर्फ पप्पु यादव यास अटक करण्यात आली असून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी साहित्य पुरवठा करणारे फरार आहेत. सदरची कारवाई भरारी पथक १ चे जे. एस. जाखरे, दुय्यम निरिक्षक आर व्ही रावुळ, यशपाल पाटील, जवान सुनील दिघोळे, धनराज पवार, राहुल पवार, यांनी पार पाडलेली आहे.
पुढील तपास निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ चे जे. एस. जाखरे नाशिक हे करीत आहेत.