युजी 2021 चा निकाल जाहीर करायला सुप्रीम कोर्टाकडून परवानगी

नवी दिल्ली,

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणार्‍या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अंडर ग-ॅज्युएटस 2021 साठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्याने एनटीएला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. दोन विद्यार्थ्यांसाठी 16 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी ठेवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं आता 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करायला परवानगी दिली आहे. हायकोर्टानं दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेनंतर नीट निकाल थांबवला होता. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, 2 विद्यार्थ्यांसाठी आम्ही निकाल थांबवू शकत नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. कोर्टानं याचिका दाखल केलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुद्यावर छढअला नोटिस जारी केली आहे. दिवाळीनंतर यावर सुनावणी होणार आहे.

हा निकाल लागण्यास होत असलेल्या उशीरामुळं एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळा निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही.

कोर्टानं एनटीएला याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचं सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचं सांगितलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!