आदिवासी पाड्यावर भाजीपाला वाटप गिरडगाव येथील समाजसेवा ग्रुपचा अनोखा उपक्रम.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव जिल्हा प्रतिनिधी नाना पाटील सर

यावल -तालुक्यातील गिरडगाव येथील समाजसेवा ग्रुपच्या माध्यमातून तरूणांनी एकत्र येत आदिवासी वस्तीवर भाजीपाला वितरण केला. कोरोना विषाणुच्या काळात सर्वसामान्या पासुन ते गरीब कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला.अशा कुटुंबांना अनेकां कडून मदत करण्यात आली तेव्हा ग्रामिण भागातील आदिवासी बांधवांना देखील मदत करीत सेवाभावी उपक्रम राबवण्यात यावा या उद्देशाने तरुणांनी आपसात वर्गणी करून त्या पैशातून सुमारे ६५ कुटुंबांना भाजीपाला वितरण केला
कुणाला मदत करण्या करीता आपल्या कडे किती क्षमता आहे या पेक्षा आपल्या मध्ये मदत करण्याची दानत आहे हे महत्वाचे असते तेव्हा आपण देखील आप आपल्या यथा शक्ती प्रमाणे गरजुंना मदत करावी म्हणुन गिरडगाव ता. यावल येथील समाज सेवा गृपच्या तरूणांनी पुढाकार घेतला व आपण सर्व तरूण दररोज खर्च केल्या जाणाऱ्या पैशाची बचत करावी व ते पैसे एकत्रीत करून त्यातुन गरजुंना मदत करावी असा निर्णय तरूणांनी घेतला व रविवारी सांयकाळी गिरडगाव ता. यावल येथील आदिवासी वस्तीवर समाजसेवा ग्रुपचे तरूण गेले आणी तेथील सुमारे ६५ कुटुंबांना मोफत भाजीपाला त्यांनी वितरण केला सदरील उपक्रम हा मध्यम कुटुंबातील तरूणांनी एकत्र येत राबवला या उपक्रम प्रसंगी समाजसेवा ग्रुपचे विकास पाटील, ओम अमलदार, किरण बोरसे, दिलीप पाटील, असलम तडवी, इरफान तडवी, किरण बारेला, मोहन बारेला, नुऱ्या बारेला,कैलास बारेला आदी तरुणांची उपस्थिती होती त्याच्या या कौतुकास्पद कार्याचे गिरडगाव सह परिसरात कौतुक होत आहे
असा दिला भाजीपाला.
आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी कुटुंब हिरवी मिरची, कोथंबीर, वांगे सह आदि भाजीपाला एकत्र करून किट तयार केले व आदिवासी वस्तीवर जावुन सन्मानाने तेथील नागरीकांमध्ये त्याचे वितरण केले.-पुर्ण-फोटो आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!