उमेदवार हा तुमच्या पसंतीनुसार मिळणार.. शिवसेनेचा मोठा धमाका वरणगाव तालुका भुसावळ प्रभाग क्रमांक 18 सिद्धेश्वर नगर येथे हिंदू मुस्लिम दलित बांधवांना आवड निर्माण झाली शिवसेनेची….
मांडवे दिगर च्या एक ग्रामपंचायत सदस्य सह 22 कार्यकर्त्यांचा समावेश
प्रत्येक शिवसैनिक बोलतोय होय मी आहे मुख्यमंत्री
वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगरातील प्रभाग क्रमांक 18 मधील तरुण व काही महिलांनी एकुन एकशे सत्तावन जणांनी प्रवेश केला मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर तसेच मुस्लीम समाजाची नेते जाफर अली मकसूद अली यांच्या वर विश्वास ठेवून मंगळवारी सायंकाळी सिद्धेश्वर नगरात झालेल्या भव्य-दिव्य असा प्रवेश सोहळयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता
यासंदर्भात हे आघाडी सरकार ची घोषणा झाल्यापासून कार्यकर्ते व मध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की ज्या पक्षाचे आपण आरोप-प्रत्यारोप करत हेवेदावे करत होतो त्याच पक्षाबरोबर नवीन नाते जुळवुन घेत राज्यातील जनतेची सेवा करायची आहे
किंबहूना हे आघाडी सरकार शक्य आहे का असे बरेचसे प्रश्न विरोधी पक्षनेते व महाराष्ट्रातील जनतेला अवघड असे वाटत होते
परंतु आजपावतो महाराष्ट्र सरकार हे गुण्यागोविंदाने राज्य चालवत आहे
बहुतेक पक्षांमध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा उमेदवाराची मुलाखत घेतली जाते व त्यातून योग्य तो किंवा घराणेशाहीला प्राधान्य देऊन उमेदवार हा दिला जात असे
सर्वसाधारण कार्यकर्ते हे मेहनतीने जोमाने ईमानदारी पक्ष वाढवण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा असतो
अन्य काही पक्षातील जोमाने पक्ष वाढीसाठी काम करणारे काही कार्यकर्त्यांना कुणाला उमेदवारी दिली जाते तर कुणाला नाकारली जाते
व इतर काही पक्षांत तर कुठलीही संधी न देता फक्त आश्वासन दाखवून वापर केला जात असतो
असं काही कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करत बोलले जाते
या सर्व प्रकाराला फाटा देत शिवसेनेने एक आगळावेगळा धमाका करत सिद्धेश्वर नगर मध्ये उमेदवार हा तुमच्या पसंतीचा बोलताच वार्ड क्रमांक अठरा येथे टाळ्यांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करुन कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आंनदीमय वातावरण होऊन
फुलांचा वर्षाव होत मिठाई वाटप करत कार्यकर्त्यांमध्ये एक दुसऱ्याची गळाभेट घेतलेली पाहावयास मिळत होती
व्यासपीठावर असलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचे असा आनंदी मय क्षण बघून यात तर काहींचे डोळेही पाणावलेले दिसत होते
उमेदवार हा तुमच्या पसंतीनुसार मिळणार या शिवसेनेच्या घोषणे प्रमाणे इतर पक्ष पण अशी घोषणा करतात की काय असे वरणगावातील सुज्ञ मतदारांमधुन बोलले जात आहे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मुळातच हिंदू मुस्लिम व दलित बांधवांमध्ये वाद विवाद हे होतच नाही पण काही समाजकंटक गुंड प्रवृत्तीचे जातीजातीमध्ये भांडण लावून स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न करत असतात तरी प्रत्येक समाजातील नागरिकांनी जागृत होऊन अशा समाजकंटकापासुन सावध राहावे
अशा अनेक पक्षात इतर जाती धर्मातले लोक हे एकत्र येत आहे मग तो पक्ष कुठलाही असो तर जाती-धर्मांमधले होणारे भांडण दंगे यांचा समुळपणे हे नष्ट होणार
याचा एक नवा आदर्श या भारत देशात पाहवयास मिळणार आहे व जातिभेद नेमका काय असतो हे येणाऱ्या पिढीला याची किंचितशी कल्पनाही ही येणार नाही
तेव्हाच भारत देश हा जगामध्ये उच्च अशा शिखरावर पोहचत भारत देश सर्वशक्तिमान होणारचं यात कुठलीच शंका नाही
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर प्रमुख अतिथी जिल्हा नियोजन समिती सदस्य एडवोकेट मनोहर खैरणार अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अफसर खान शिक्षक सेनेचे इलियास खान कार्यालय प्रमुख उत्तम सुरवाडे सर जिल्हा संघटन विलास मुंडे विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे सर भुसावळ शहर प्रमुख नीलेश महाजन उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे एडवोकेट कैलास लोखंडे मुस्लिम समाजाचे नेते हिप्पी सेट कस्तुराबाई सुरवाडे
योगिता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सईद मुल्लाजी बाळू माळी यशवंत बडे उमाकांत झांबरे निलेश काळे राजू माळी ताज शहा अब्रार खान राहुल वंजारी अरबाज पैलवान पवन माळी आबा सोनार अमर सोनार दीपक पाटील असलम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
सूत्रसंचालन निलेश ठाकूर संतोष सोनवणे यांनी केले.