भुसावळ ता वरणगाव शहरात रेल्वे रोको आंदोलन
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील
भारतीय संविधान जगातले सर्वात मोठे संविधान आहे आणि याचे सर्व लिखाण हस्तलिखित आहे
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला संविधान हे भारतामध्ये २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आले
संविधान लिहिण्यासाठी सलग २ वर्षे ११ महिने व १८ दिवस कठोर मेहनत घेत संविधानाची निर्मिती करत इतिहास रचला होता
भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्या स्वतःच्या शरीर प्रकृती ची काळजी न घेतल्यामुळे त्यांचे आयुष्यही कमी होऊन दि ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार देऊन त्या मताच्या आधारेच हुकूमशाहीला मोडीत काढून सत्ता निर्माण करण्याचे महान काम केले आहे
आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला या संविधाना नुसारच आचरण करावे लागते
याच संविधान नावाचा उल्लेख करत नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला
नाव देण्याचा दि ३०रोजी महाराष्ट्रात इतर ठिक ठिकाणी
पीआरपी तर्फे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला
वरणगाव रेल्वे स्टेशन येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चे उपजिल्हाध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हरीश सुरवाडे अनिल सुरवाडे शागीर शहा रोशन शहा किरण तायडे यांनी वरणगाव स्टेशन मास्तर यांना नवीमुंबई विमान तळाला संविधान नाव देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करत निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे
शासनाने कोरोना संदर्भात लावलेले नियम अटींचे तंतोतंत पालन केले असून पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून रेल्वे रोको आंदोलनाची समाप्ती करण्यात आली