समाजसेविका तृप्ता महाजन गरजू महिलांसाठी उपलब्ध करणार रोजगाराची संधी

परिसरातील महिला वर्गात आनंदाचे वातावरण

वरणगाव प्रतिनिधी-

समाजसेविका सौ तृप्ता महाजन यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने अगरबत्ती तसेच धूप अगरबत्ती तयार करण्याबाबत प्रशिक्षण जगदंबा नगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते प्रसंगी गरीब व गरजू तसेच होतकरू महिलांना सदर बाबतीत प्रशिक्षण देण्यात आले व पुढील उद्योग सुरू करणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच सदार उद्योगासाठी लागणारी मशिनरी बँकेमार्फत होणारा अर्थपुरवठा तसेच इतर मार्गदर्शन करण्यात आले सदर प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सौ जयश्री इंगळे उपस्थित होत्या त्यांनी महिलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून सूचना केल्या व जागेवरच अनेक महिलांनी काम करणे बाबत तयारी दर्शवून अर्ज भरून दिले व पुढील कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात उद्योग सुरू करण्यात येतील असे सौ तृप्ता महाजन यांनी सांगितले त्यासाठी सर्व महिलांना योग्य ते सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सौ पुनम बराटे तालुका उप संघटिका योगिता सोनार समाजसेविका सौ मीना सोनार यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रशिक्षणार्थी महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी प्रशिक्षणार्थी महिला भगिनींनी सदर उपक्रमाची प्रशंसा करत सहभागी होण्याचे आश्वासन दिले असून लवकरात लवकर महिलांसाठी नवीन गृह उद्योगांची उभारणी करण्यात येईल व त्यामध्ये गटागटाने महिलांना सामावून घेण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक सौ तृप्ता महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दिशा महाजन यांनी मानले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!