नेत्रज्योत फाऊंडेशनच्या वतीने वडाळागाव येथे नेत्र तपासणी शिबीर

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) :

साधन केंद्र, विनंती महिला बचत गट व नेत्रज्योत फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळागाव राजवाडा परिसरात नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

नेत्रज्योत फाऊंडेशनचे संचालक ए.एस. भालेराव , ऑप्टीशियन श्रद्धा गांगुर्डे, विमल मॅडम, स्वाती बागुल आदी कर्मचार्यांनी नागरिकांची तपासणी केली. व नेत्र तपासणी शिबीरात नागरिकांना भाग घेण्याचे आवाहन केले.
वडाळागाव राजवाडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबीरात भाग घेऊन प्रतिसाद दिला. नेत्रज्योत फाऊंडेशनच्या वतीने अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नेतेज्योत फाऊंडेशनचे संचालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!