साहित्य परिषदेकडून ‘ काव्य गौरव ‘ पुरस्कार जाहीर..

त्र्यंबकेश्वर! प्रतिनिधी: –

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्ह्याच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. 17 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय दहाव्या निमंत्रितांच्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला आहे. या निमीत्ताने ‘ काव्य गौरव ‘ पुरस्कारांची घोषणा घोषणा स्वागताध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. आनंद अहिरे व आयोजक तथा जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी संयुक्तपणे केली.

यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ( 10) दहा प्रतिभावंत कवींचा ‘ काव्य गौरव ‘ पुरस्काराने सन्मान होणार आहे.काव्य गौरव पुरस्कारासाठी घोषणा झालेल्या सन्मानित कवींमध्ये कवी अविनाश ठाकुर ( डोंबीवली ) प्रदीप सरवदे ( मुंबई ) प्रतीभा जाधव ( लासलगाव ) नवनाथ रणखांबे, कविता मोरवणकर,अंबादास खोटरे, शांताराम वाघ, श्रीराम तोकडे , माधवी ययाती – पारख ( इगतपुरी ) विनय पाटील ( जळगाव ) आदींचा समावेश करण्यात आला आहे.

काव्य गौरव पुरस्कार सन्मानित होणार्या कवींचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, शुभांगी काळभोर, प्रदेश उपाध्यक्ष देवीदास खडताळे, देवचंद महाले, प्रदीप पाटील, तुकाराम चौधरी, आबा अहिरे, किरण मोरे, संजय कान्हव, सागर हांडे आदींसह असंख्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!