भाजप नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रविण दरेकर संतापले आणि म्हणाले…

ठाणे,

सध्या भाजपाच्या जन आशीवार्द यात्रेवरुन भाजपा आणि सेनेत चांगलीच जुंपली असल्याचं पहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपाचे विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी जन आशीवार्द यात्रा आयोजक आणि भाजपा नगरसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

अजित पवार हजारोंच्या गर्दीत कार्यालयाचे उद्घाटन करतात, शिवसेना हजारोंचे मेळावे घेतात यावेळेस पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण भाजपाच्या जन आशीवार्द यात्रेला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून सत्ताधारी जाणीवपुर्वक आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत अता थेट आरोप सरकारवर केलाय. हिम्मंत असेल तर उद्घाटन करणारे आणि मेळावे घेणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन दाखवा असही यावेळेस प्रविण दरेकर म्हणाले.

ठाण्यात ग्लोबल हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केल्याने कर्मचारी हॉस्पिटल बाहेर आंदोलन करत आहेत. या ठिकाणी प्रविण दरेकर यांनी भेट दिली आणि कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. जर येत्या दोन दिवसात ठाणे महानगरपालिकेने या कर्मचार्‍यांना सामावून घेतले नाही तर भाजपा उग- आंदोलन करेल आणि ग्लोबल हॉस्पिटल बंद पाडेल असा इशाराही यावेळेस प्रविण दरेकर यांनी दिलाय. तर कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे आणि त्याचे श्रेय ही घ्यावे असा खोचक टोला विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही लगावला आहे.

गेल्याच महिन्यात ग्लोबल हॉस्पिटलने शेकडो कर्मचार्‍यांना कामावरुन काढले होते, तेव्हा प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे त्या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. मात्र आता पुन्हा त्यांना सेवेतून काढण्यात आले आहे. खरं तर ठाणे महानगरपालिकेचे ग्लोबल कोविड हॉस्पिटल हे सुरुवाती पासूनच वादात आहे. कधी बेडसाठी पैसे घेतल्याप्रकरणी, कधी नियम धाब्यावर बसवून सेलिबि-टींना लस दिल्या प्रकरणी तर कधी मनमानी कारभारामुळे पण असं असून सुद्धा ठाणे महानगरपालिका काहीच कारवाई करत नाहीये कारण या ग्लोबल हॉस्पिटलवर थेट मंत्र्यांचा हात आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी चर्चा सध्या ठाण्यात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!