रावेर येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न..

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि – ( राजेश वसंत रायमळे mob.- 9764742079 ) यांचेकडून

आज दि.२५ सोमवार रोजी सकळी ठिक ११:०० वा.नवीन शासकीय विश्रामगृह रावेर येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक जळगांव जिल्हा उपाध्यक्ष शाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वात पार पार पडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.२५ रोजी रावेर येथील नवीन शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत चोपडा तालुक्यातील महेश निंबा पाटील यांचे हाती अध्यक्ष पदाची धुरा देत हेमंत गायकवाड आणि सतिश भदाणे उपाध्यक्ष, तर विश्वास वाडे सचिव पदी नियुक्त झाले, तसेच रावेर तालुक्यातील नवीन सदस्य नियुक्त करून काही नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन पदभार देण्यात आला रावेर तालुका कार्यकारिणीत राहुल मनोहर जैन ता.सचिव,राजेश वसंत रायमळे ता.संपर्क प्रमुख,अतुल विंचुरकर ता.कार्याध्यक्ष प्रमोद कोंडे ता.प्रसिध्दीप्रमुख पदी तर ईश्वर शर्मा, पुरूषोत्तम पाटील, संतोष पाटील दिलीप महाजन यांची ता.उपाध्यक्ष पदी निवड झाली.तसेच ता.संघटकपदी ईश्वर महाजन, विजय एस.अवसरमल, आणि सुनिल पाटील आदींची वर्णी लागली तर ता. सहसंघटक विजय के.अवसरमल आणि ता.सहसचिवपदी प्रभाकर महाजन यांची निवड झाली.
संघटणा म्हणजेच एकसुत्र गठबंधन शाकीर शेख:- बैठकीला मार्गदर्शन करतांना जि.उपाध्यक्ष शाकीर शेख म्हणालेत की,संघटणा ही एकसुत्र गठबंधनाप्रमाणे असते, ज्याप्रमाणे एखादा झाडू अथवा फळी जोपर्यंत एकसुत्रात बांधलेले असतात तोपर्यंत ते कचरा साफ करण्याचे काम करतात मात्र ते विखुरले तर स्वतःच कचरा बनतात.म्हणून संघटनेत एकसुत्रता नसेल तर त्या संघटणेचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच प्रमाणे आपले मनोगत व्यक्त करतांना ता.अध्यक्ष योगेश पाटील म्हणालेत की, आम्ही नुतन कार्यकारिणीतील सर्वच सदस्य एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवून सामंजसपणे संघटनेत एकसुत्रता ठेवत संघटण वाढीसाठी नेहमीच प्रयत्नरत राहू.
यावेळेस प्रदीप महाराज,महेश पाटील,सतिश भदाणे,प्रभाकर महाजन,सुमित शर्मा,हेमंत गायकवाड,विश्वास वाडे,राजेश रायमळे,अतुल विंचुरकर, दिलीप महाजन, ईश्वर शर्मा,राहुल जैन, पुरूषोत्तम संघपाल,ईश्वर महाजन, योगेश पाटील, विजय एस.अवसरमल,विजय के.अवसरमल,प्रमोद कोंडे,राजेंद्र देशमुख आदींसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रावेर तालुक्यातील पत्रकार वृंदाने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ईश्वर महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!