हरली पण शेवटपर्यंत भिडली! मेरी कॉमचं आव्हान संपुष्टात
टोकियो
29 जुलै
टोकियो ऑॅलिम्पिकमधून भारतासाठी एक निराशाजनक बातमी. पदकाची दावेदार असलेली भारताची आघाडीची महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम टोकिया ऑॅलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. 51 किलो वजनी गटात मेरी कोमला पराभवा पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रीडा प्रेमींना धक्का बसला आहे.
16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इगि-ट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली. पहिली फेरी वॅलेन्सियाने 1-4 अशी जिंकली. दुसर्या फेरीत मेरी कोमने जोरदार कमबॅक करत ही फेरी 3-2 अशी जिंकली. पण तिसर्या फेरीत तिसर्या फेरीत वॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केलं नाही तर सामना 3-2 ने जिंकला.
38 वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या वॅलेन्सियाला कडवी टक्कर दिली, पण या दिग्गज बॉक्सरचा ऑॅलिम्पिकमधला प्रवास इथेच थांबला आहे.