टेस्ट चॅम्पियनशिपचं नवीन शेड्युल आणि झेळपीं डूीींशा जाहीर
मुंबई
14 जुलै
भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑॅगस्टपासून सुरू होणार्या 5 सामन्यांच्या कसोटी सामन्यापासून सुरू होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार्या सामन्यांचं शेड्युल आणि पॉइंट सिस्टिम जाहीर केली आहे. ेंऊण् स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलं आहे. क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेनेही पॉइंट सिस्टमची घोषणा केली आहे, जी संघाच्या लीग टेबलच्या आधारे निश्चित केली जाईल.
स्पर्धेच्या मध्यभागी पॉईंटस सिस्टम बदलल्यामुळे आयसीसीला पहिल्याच चक्रात बरीच टीका झाली. त्याचे कारण असे की कोव्हिड -19 च्या साथीमुळे बरेच सामने पूर्ण होऊ शकले नाहीत. सध्या, व्हायरसची भीती अद्याप संपलेली नाही. जगातील सद्य परिस्थिती लक्षात घेता आयसीसीने आपली पॉइंटस सिस्टम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कशी असणार नवीन पॉइंट सिस्टिम?
एका सामन्यासाठी 12 गुण असणार आहेत.
2 सामन्यांची सीरिज होणार असेल तर 24 गुण मिळणार
3 सामन्यांची सीरिज होणार असेल तर 36 गुण मिळणार
4 सामन्यांची सीरिज होणार असेल तर 48 गुण मिळणार
5 सामन्यांची सीरिज होणार असेल तर 60 गुण मिळणार
सामना टाय झाला तर 6 गुण मिळणार
सामना ड्रॉ झाला तर 4 गुण मिळणार
ज्या टीमचा पराभव होणार त्याला एकही गुण मिळणार नाही
31 मार्च 2023 पर्यंत हे सामने खेळवले जाणार असून त्यातून अंतिम सामन्यासाठी निवड होणार आहे. गुणांच्या आधारे अंतिम सामन्यासाठी निवड होणार आहे. तर भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज हा देखील ेंऊण् 2023 चा एक भाग असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.