डबलिन एकदिवसीय : आयरलैंड दक्षिण आफ्रिकेला 43 धावांनी हरविले
डबलिन प्रतिनिधी
14जुलै
कर्णधार अॅडी बलबर्नी (102) च्या शानदार शतक आणि हॅरी टॅक्टर (79) च्या उत्कृष्ट अर्धशतकाच्या जोरावर आयरलँड संघाने येथील द विलेजमध्ये खेळण्यात आलेल्या दुसर्या एकदिवशीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 43 धावाने पराभूतकरुन तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला आणि आयरलँडने प्रथम फलंदाजी करत बलबर्नीच्या 117 चेंडूत 10 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 102 तसेच हॅरीच्या 68 चेंडूत सहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने 79 धावांच्या जोरावर 50 षटकांमध्ये पाच बाद 290 धावसंख्या उभारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेचा संघ जानेमान मलानच्या 96 चेंडूत सात चौकार व चार षटकारांच्या मदतीने 84 धावां ंनंतरही 48.3 षटकात सर्वबाद 247 धावासंख्या करु शकला. संघाकडून रॅसी वॉन डेर डुसैनने 49, डेव्हिड मिलरने 24, केशव महाराजने 17, कॅगिसो रबादाने 16, काइल वेरिनने 13 आणि कर्णधार टेम्बा बावुमाने 10 धावा केल्या.
आयरलँडकडून मार्क एडेयर, जोशुआ लिटल आणि अॅडी मॅकब-ेनने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर क्रॅग यंग, सिमी सिंह आणि जॉर्ज डॉकरेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
या आधी आयरलँडच्या संघासाठी बलबर्नीचे शतक आणि हॅरीच्या अर्धशतक तसेच डॉकरेलने 45, मॅकब-ेने 30 आणि पॉल स्टलिंगने 27 धावांचे योगदान दिले.
दक्षिण अफ्रिकेकडून आदिले फेहलुकवायोने दोन, रबादा, केशव महाराज आणि तबरज शम्सीने प्रत्येकी एक गडी बाद केला. दोनीही संघातील पहिला सामना हा पावसाच्या कारणामुळे विना परिणामाचा राहिला होता. तिसरा व शेवटचा सामना हा 16 जुलैला याच मैदानावर खेळला जाणार आहे.