थढउ: सामन्याआधी ब्रिटिश खेळाडूंचा माईंडगेम, ’म्हणतात किवींचा विजय पक्का’
मुंबई प्रतिनिधी
17 ऑगस्ट
टेस्ट क्रिकेटचा चॅम्पियन कोण, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान खेळवण्यात येणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याला आता अवघा एक दिवस उरला आहे. पण त्याआधीच इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी माईंडगेम सुरु केला आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायक वॉर्न आणि अॅलिस्टर कुक यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला अधिक संधी आहे.
मायकेल वॉर्नने दिलेल्या एका मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं. या सामन्यात न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचं वॉर्ननं म्हटलं आहे. भारतीय संघाविरुद्ध बोलल्याने सोशल मीडियावर आपल्यावर टीका केली जाईल हे मला माहित आहे, पण इंग्लंडविरुद्ध गेल्या दोन टेस्ट सामन्यात न्यूझीलंडची कामगिरी पाहता त्यांना सर्वाधिक संधी आहे, असं वॉर्नने म्हटलं आहे.
वॉर्नच्या मते न्यूझीलंडचा संघ सर्वप्रकारे समतोल आहे. टेस्ट क्रिकेटसाठी लागणारी मोठी खेळी करण्याची क्षमता न्यूझीलंडच्या फलंदाजांमध्ये आहे. तसंच त्यांच्याकडे सर्वोत्तम गोलंदाजही आहेत.
अॅलिस्टर कुकनेही विजयासाठी न्यूझीलंडला पसंती दिली आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, तसंच इथल्या वातावरणाशीही त्यांनी जुळवून घेतलं आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची माजी खेळाडू आणि समालोचक ईशा गुहाने मात्र भारतच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय संघात सक्षम फलंदाज आणि आक्रमक गोलंदाजांचं चांगला ताळमेळ आहे, आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सर्वोत्तम असल्याचं ईशा गुहाने म्हटलंय.