ष्ठतरच राहुल द्रविड होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक
नवी दिल्ली,
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडवर मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे. राहुल द्रविडने भारतामध्ये होणार्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तात्पुरत्या स्वरुपात भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळावे यासाठी बीसीसीआय प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे. टी-20 विश्वचषकानंतर सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक प्रशिक्षक आपली पदे सोडणार असल्यामुळेच राहुल द्रविड सारख्या विश्वासू व्यक्तीवर संघाची जबाबदारी सोपवण्यासाठी बीसीसीआयने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय प्रशिक्षक होण्यासंदर्भातील इच्छा ऑस्ट्रेलियातील काही प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. पण भारतीय प्रशिक्षकाला बीसीसीआयकडून प्राधान्य क्रम दिला जाणार आहे. भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात सकारात्मक काही घडले नाही, तरच परदेशी प्रशिक्षकांचा विचार केला जाणार आहे. पूर्णवेळ प्रशिक्षक द्रविडने व्हावे, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. यासाठी द्रविडला प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची विनंती बीसीसीआयने केल्याची माहिती समोर आली आहे. पण ही विनंती द्रविडने नाकारली असून एवढा प्रवास करण्याची आपल्याला इच्छा नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे.
असा उमेदवार आम्हाला हवा आहे की या कामासाठी जो अगदी योग्य असेल. आम्हाला अशी परिस्थिती नको आहे की अनेक अर्ज आले, पण कोणीही योग्य नाही, असे व्हायला नको. अनेक उमेदवार असले आणि असे झाल्यास ते आमच्यासाठी लज्जास्पद ठरेल. त्यामुळे योग्य उमेदवार शोधण्यास आमचे प्राधान्य राहील. तोपर्यंत द्रविडलाच आम्ही तात्पुरता प्रशिक्षक म्हणून पाहत असल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्यांनी सांगितले.
द्रविडने भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात करण्यात आलेली विनंती नाकारली आहे. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे रवी शास्त्री यांची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही आपली प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असेल, असे जाहीर केल्यानंतर बीसीसीआयकडून द्रविडला या पदासाठी विचारणा करण्यात आलेली. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
शास्त्री यांच्यासोबतच भारतीय संघाच्या सपोटींर्ग स्टाफमधील अनेकजण आपले पद सोडणार आहे. यामध्ये गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण शिकवणारे आर. श्रीधर यांचाही समावेश आहे. तसेच प्रशिक्षकांपैकी एक असणार्या निक वेब यांनीही टी-20 विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचे म्हटल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता पर्याय म्हणून आता पासूनच नवीन प्रशिक्षकांचा शोध बीसीसीआयने सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून बीसीसीआयकडून राहुल द्रविडला या पदासाठी अर्ज करण्याची विनंती करण्यात आलेली. पण ही विनंती द्रविडने फेटाळून लावली आहे. सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे 48 वर्षीय द्रविड काम पाहत असून त्याने यापूर्वीही श्रीलंकेच्या दौर्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. 19 वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला द्रविड प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याचा प्राधान्य दिले आहे. द्रविडने यापूर्वीही 2016 आणि 2017 साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. जे काम आपण करत आहोत, त्यामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचे सांगत द्रविडने मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजी तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिले होते. द्रविडची तिच भूमिका आजही कायम असल्यामुळे बीसीसीआय आता द्रविडला यासाठी कसे तयार करते हे येणार्या काळामध्ये स्पष्ट होईल.