गायकवाडच्या शतकी खेळीनंतर प्रशिक्षक फ्लेमिंगची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

अबुधाबी,

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ॠुतुराज गायकवाड याने 60 चेंडूत 101 धावांची खेळी केली. यासह तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा सीएसकेचा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, शतक केल्यानंतर देखील चेन्नईचा पराभव झाला. सीएसकेचा राजस्थान रॉयल्सने 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

स्टिफन फ्लेमिंग सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले की, गायकवाडने शानदार खेळी केली. क्वचितच होत की, शतक झाल्यानंतर त्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागते. आम्ही पराभवाबाबत नक्कीच आत्मपरिक्षण करू. पण गायकवाडच्या वैयक्तिक कामगिरीचा आम्ही जल्लोष साजरा करू.

गायकवाडने कामगिरीत सातत्य दाखवले आहे. नेहमीप्रमाणे आमची आशा अधिक आहे. पण त्याची कामगिरी शानदार होती. आम्हाला त्याचा अभिमान आहे. तो ज्या पद्धतीने खेळत आहे. ते पाहता आम्ही खूप खूश आहोत, असे देखील फ्लेमिंगने सांगितलं.

दरम्यान, गायकवाडने आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात 50.80 च्या सरासरीने 508 धावा केल्या आहेत. यानंतर पंजबाब किंग्सचा कर्णधार के एल राहुलच्या नावावर 489 धावा आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!